अन्न व्यवसायिकांनी वार्षिक
परतावा ऑनलाईन पध्दतीने विहित मुदतीत करावेत
अन्न व औषध प्रशासन विभागाचे
आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 06 : अन्न सुरक्षा
व मानदे कायदा-2006 व अन्न सुरक्षा व मानदे (अन्न व्यवसायिक यांचे परवाना व
नोंदणी) नियमन 2011 नियम-2(1) 13.1 नुसार सर्व उत्पादक, व्यापारी व आयातदार यांना
प्रत्येक वर्षाच्या 31 मे पूर्वी आपल्या अन्न व्यवसायाचा वार्षिक परतावा डी-1 या
विहित नमुन्यात सादर करावयाचा असतो. आर्थिक वर्ष 2021-22 पासून उपरोक्त वार्षिक
परतावा हा सर्व उत्पादक, व्यापारी व आयातदार यांना ऑनलाईन पध्दतीनेच सादर करावयाचा
आहे. हा वार्षिक परतावा सर्व अन्न व्यवसायिकांनी www.FosCos.fssai.gov.in या प्रणालीवर
जाऊन अकाऊंट वरुन अथवा file express annual return या टॅबवर जाऊन ऑनलाईन पध्दतीने
भरावयाचा आहे.
या अनुषंगाने परभणी व हिंगोली जिल्ह्यातील सर्व
उत्पादक, व्यापारी व आयातदार यांनी सन 2021-22 या आर्थिक वर्षाचा परतावा डी-1 या
विहित नमुन्यामध्ये ऑनलाइन पध्दतीने www.FosCos.fssai.gov.in
या प्रणालीवर जाऊन दि. 31 मे, 2023 पर्यंत दाखल करावयाचा आहे. या तारखेनंतर
वार्षिक परतावा भरल्यास सर्व उत्पादक, व्यापारी व आयातदार यांना प्रत्येक दिवस 100
रुपये याप्रमाणे दंड भरुनच आपला वार्षिक परतावा भरावा लागेल. दंड टाळण्यासाठी आपला
वार्षिक परतावा दि. 31 मे, 2023 पूर्वी ऑनलाईन पध्दतीने भरावा.
तसेच आर्थिक वर्ष 2022-23 या वर्षातील वार्षिक
परतावाही ऑनलाइन पध्दतीने दि. 31 मे, 2023 पर्यंत दाखल करावा. अन्यथा दंडासहीत
वार्षिक परतावा भरावा लागेल. दंड अथवा उपरोक्त कायद्यानुसार कार्यवाही टाळण्यासाठी
आपण आपला वार्षिक परतावा मुदतीतच ऑनलाइन पध्दतीने सादर करावा, असे आवाहन अन्न व
औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त नारायण सरकटे यांनी केले आहे.
****
No comments:
Post a Comment