उन्हाची तीव्रता वाढल्याने पक्की अनुज्ञप्ती चाचणी व योग्यता
प्रमाणपत्र नुतनीकरण
तपासणीच्या वेळेत बदल
हिंगोली
(जिमाका), दि.24 : उन्हाची तीव्रता वाढल्याने येथील उप्रपादेशिक परिवहन कार्यालयात
पक्की अनुज्ञप्ती चाचणी व योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी येणाऱ्या अर्जदार वाहन
चालक/मालक यांना उन्हाचा त्रास होत आहे. त्यामुळे नागरिकांना उन्हाचा त्रास कमी होण्यासाठी
दि. 24 एप्रिल, 2023 पासून उपप्रादेशिक कार्यालय, हिंगोली येथील पक्की अनुज्ञप्ती चाचणी
व योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण तपासणीसाठीची वेळ सकाळी 7.00 ते दुपारी 3.00 याप्रमाणे
करण्यात आलेली आहे.
जिल्ह्यातील पूर्व अपॉइंटमेंट घेतलेल्या
सर्व अर्जदार नागरिकांनी आपल्या अपॉइंटमेंटच्या दिवशी सकाळी 7.00 ते 9.00 यावेळेत उप्रप्रादेशिक
कार्यालय, हिंगोली येथे उपस्थित राहावेत व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन उप प्रादेशिक
परिवहन अधिकारी अनंता जोशी यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment