24 April, 2023

 

जत्रा शासकीय योजनांची-सर्वसामान्यांच्या विकासाची कार्यक्रमांतर्गत

सुशिक्षित बेरोजगार उमेदवारासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन

                                                                                                             

            हिंगोली (जिमाका), दि.24 : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व मॉडेल करिअर सेंटर (एनसीएस) हिंगोली यांच्यामार्फत हिंगोली जिल्ह्यातील नोकरी इच्छूक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने जत्रा शासकीय योजनांची-सर्व सामान्यांच्या विकासाची या कार्यक्रमांतर्गत हिंगोली जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी दि. 26 एप्रिल ते 28 एप्रिल, 2023 या कालावधीत पंडित दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

परिवार सुपर बाजार, हिंगोली यांचे कॉम्प्यूटर ऑपरेटरची-8 पदे, अकाऊंटंट- 2, सेल्समन-20, सेक्युरिटी गार्डची 4 पदे विहित शैक्षणिक अर्हता व वयोमर्यादेनुसार भरण्यात येणार आहेत. तर वामनराव बोर्डीकर इंग्लीश स्कूल, औंढा नागनाथ यांची शिक्षक/शिक्षिकाची 8 पदे, लिपिक-01, संगीत शिक्षक/शिक्षिका-02 व शारिरीक शिक्षक-01 याप्रमाणे विहित शैक्षणिक अर्हता व वयोमर्यादेनुसार भरण्यात येणार आहेत.

या रोजगार मेळाव्यात परिवार सुपर बाजार, हिंगोली व वामनराव बोर्डीकर इंग्लीश स्कूल, औंढा नागनाथ या आस्थापनांचे 45 पेक्षा अधिक रिक्तपदे अधिसूचित केलेली आहेत. जिल्ह्यातील दहावी, बारावी, पदवी, बी.एससी, डी.एड, बी.एड या शैक्षणिक अर्हतेनुसार https://rojgar.mahaswayam.gov.inwww.ncs.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अधिसूचित केलेली आहेत.

नोकरी इव्छुक उमेदवारांनी वरील संकेतस्थळावर नोंदणी पूर्ण करुन शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्त पदासाठी ऑनलाईन अर्ज करावेत. जेणे करुन त्यांना ऑलनाईन रोजगार मेळाव्यात सहभागी होता येईल. याबाबत काही अडचण आल्यास 7972888970 किंवा 7385924589 या भ्रमणध्वनी  क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त डॉ. राजपाल कोल्हे यांनी केले आहे.

 

*****

No comments: