24 April, 2023

 

सामाजिक समता पर्वनिमित्त ऊसतोड कामगारांना ओखळपत्र वाटप

                                                                                  



                           

            हिंगोली (जिमाका), दि.24 : सामाजिक न्याय व विषय सहाय्य विभागाच्या वतीने दिनांक 1 एप्रिल ते 1 मे पर्यंत सामाजिक न्याय समता पर्व साजरा करण्यात येत असून याचाच एक भाग म्हणून  दि. 24 एप्रिल, 2023 डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, हिंगोली येथे शिवानंद मिनगीरे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांच्या मार्गदर्शनाखाली ऊसतोड कामगारांना ओळखपत्र वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

            कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज,डॉ बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या प्रतिमेस उपस्थित मान्यवरांचे हस्ते पुष्प पूजन करून अभिवादन करण्यात आले.

            यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष सुनिल महिंद्रकर हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त उमेश सोनवने, उगम ग्राम विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयाजी पाईकराव, जिल्हा महिला ऊसतोड कामगार संघटनेच्या छायाताई पडघन , ऊसतोड कामगार प्रतिनिधी गोविंद मानकरी, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे आदी मान्यवर उपस्थित होते.

            या कार्यक्रमासाठी 150 ते 200 ऊसतोड कामगार उपस्थित असून त्यापैकी नोंदणी परिपुर्ण झालेल्या 20 ऊसतोड कामगारांना मान्यवरांच्या हस्ते ओळखपत्राचे वाटप करण्यात आले. उर्वरित कामकारांना ग्रामपंचायत कार्यालयस्तरावरुन व कारखान्याकडून अहवाल प्राप्त होताच त्यांचे ओळखळपत्र वाटप करण्यात येणार असल्याचे समाज कल्याण अधिकारी यांनी सांगितले. तसेच ऊसतोड कामगारांना शासनामार्फत देण्यांत येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली .

            कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवानंद मिनगीरे यांनी केले तर सुत्रसंचालन अशोक इंगोले यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सत्यजीत नटवे, श्रीकांत कोरडे, विनोद ठाकरे, सुनिल वडकुते, मनिष राजुलवार, विठ्ठल मंईग, नितीन राठोड, राजु ससाने, मोतीराम फड, सुलोचना ढोणे, पल्लवी गीते, शिल्पा वाघमारे, उखा मुरकुटे, भास्कर वाकळे, नागनाथ नकाते, संदिप घनतोडे, दिपक कांबळे, बाळू पवार, दत्ता कुंभार, मिनाक्षी बांगर, गयाबाई खंदारे, नरेश पोळकर, श्रावण खारोडे, शुभम यादव, संदिप पोळकर, संतोष होडबे, इत्यादी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

*****

No comments: