महात्मा बसवेश्वर सामाजिक
समता शिवा पुरस्कारासाठी
इच्छूक व्यक्ती, संस्थांनी
अर्ज सादर करावेत
हिंगोली (जिमाका), दि. 06 : वीरशैव
लिंगायत समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकास होण्यासाठी कलात्मक, समाज प्रबोधन
व साहित्यिक क्षेत्रात काम करणाऱ्या कलावंत साहित्यिक, समाज प्रबोधन आणि समाज
सेवकांना तसेच समाजासाठी कार्य करणाऱ्या संस्थाना प्रती वर्षी वैशाख शुध्द (अक्षय
तृतीया) या दिवशी एक व्यक्ती व एक संस्था यांना महात्मा बसवेश्वर सामाजिक समता
शिवा पुरस्कार देण्याचा निर्णय इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या दि. 8 मार्च,
2019 च्या शासन निर्णयान्वये घेण्यात आला आहे.
हिंगोली
जिल्ह्यातील सर्व वीरशैव लिंगायत समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकास
होण्यासाठी कलात्मक, समाज प्रबोधन व साहित्यिक क्षेत्रात काम करणाऱ्या कलावंत,
साहित्यिक, समाज प्रबोधन आणि समाज सेवकांनी महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा
पुरस्कारासाठी विहित नमुन्यातील प्रस्ताव दोन प्रतीत सहायक आयुक्त, समाज कल्याण,
हिंगोली यांच्याकडे वृत्त प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून 10 दिवसाच्या आत सादर
करावेत, असे आवाहन शिवानंद मिनगीरे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी
केले आहे.
****
No comments:
Post a Comment