18 September, 2023

 

आपल्या घरातच वाढवाल डास, तर आजारी पडाल हमखास

माळसेलू येथे आज दिनांक 18 सप्टेंबर, 2023 रोजी गावात घरोघरी अबेटिंग

 


हिंगोली (जिमाका), दि. 18 : प्राथमिक आरोग्य केंद्र फाळेगाव अंतर्गत उपकेंद्र माळसेलू येथे आज दिनांक 18 सप्टेंबर, 2023 रोजी गावात घरोघरी अबेटिंग करण्यात आली. तसेच रक्तजल नमुने घेण्यात आले. गावातील घरोघरी जाऊन कीटकजन्य आजाराबद्दल आरोग्य शिक्षण देण्यात आले. तसेच इंचा येथील महाविद्यालयीन विद्यार्थीना कीटकजन्य आजाराबद्दल आरोग्य शिक्षण देण्यात आले. आठवड्यातून एक दिवस शनिवार कोरडा दिवस म्हणून पाळण्यात यावा. त्यादिवशी आपल्या घरातील सर्व पाणी साठे रिकामे करुन स्वच्छ घासून पुसून कोरडे करावे.

डेंग्यू पसरवणाऱ्या अळ्या, एडिस इजिप्ती प्रजातीचे डास साचलेल्या स्वच्छ पाण्यात तयार होतात. त्यामुळे घरातील ए सी, फ्रीजखाली साचलेलं पाणी, फुलदाण्या, कूलर, कुंड्या, बादल्या, जुने टायर यांच्याकडे विशेष लक्ष ठेऊन त्यामध्ये साचलेले पाणी तात्काळ रिकामे करावे. तसेच तिथे खूप दिवस पाणी जमा होणार नाही, याची काळजी घ्यावी आपल्या घरात आणि आजूबाजूला स्वच्छता पाळणं सर्वांत महत्त्वाचं डेंग्यूचे डास सामान्यतः दिवसाच चावतात, त्यामुळे तुमच्या आजूबाजूला पाणी साचलेल्या ठिकाणी जाणं टाळावच. घरांच्या खिडक्यांना जाळी लावणे, शक्यतो सायंकाळच्या वेळेला दारं-खिडक्या बंद ठेवणे, आणि खूप डास असल्यास त्यांची विल्हेवाट लावायला उपाययोजना करणे आवश्यक आहे. तसेच साचलेल्या डबके, नाल्या, गटार यामध्ये जळके ऑइल, रॉकेल टाकणे त्यामुळे डास अळ्यांचा नायनाट होईल. उन्हाळ्यामध्ये जे आपण आपल्या घरात कुलर लावतो. त्यामध्ये जर आज पण पाणी साठलेले असेल तर ते त्वरित रिकामी करावी.

लक्षणे :- ताप आणि अंगदुखी होते डोळ्यातील फोबन्या, डोकं दुखणे, अंगदुखी, शरीरावर पुरळ, नाकातून किंवा हिरड्यांमधून रक्तस्राव, मळमळ, उलटी आणि लघवीतून रक्त बाहेर पडणं, सतत तहान लागणं आणि अशक्तपणा, अशी लक्षणं दिसतात. यावेळी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.गणेश जोगदंड , संजय पवार, चौफाडे, सोपान भालेराव,  आरोग्य सेविका श्रीमती आडे, आरोग्य कर्मचारी राजू पुंडगे  आशा स्वयंसेविका इत्यादी उपस्थित होते.

*******

No comments: