माजी सैनिक, विधवा
यांच्या पाल्यांसाठी
शिष्यवृत्ती योजनेसाठी
अर्ज करण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 15 : महाराष्ट्र शासनाच्या सैनिक कल्याण विभागामार्फत सन 2023 मध्ये इयत्ता दहावी,
बारावी व पदवी परीक्षेत किमान 60 टक्के गुण प्राप्त करुन पुढील शिक्षण घेणाऱ्या
माजी सैनिकांच्या / विधवाच्या पाल्यासाठी सन 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी
शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येणार आहे. त्यासाठी 15 ऑक्टोबर , 2023 पर्यंत
जिल्हा सैनिक कल्याण कक्ष, हिंगोली येथे योग्य त्या कागदपत्रांसह अर्ज करण्याचे
आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक
कल्याण अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
पात्रताधारक माजी सैनिक , विधवा यांच्या
पाल्यांनी अर्जासोबत इयत्ता दहावी, बारावी
व पदवी गुणपत्रिकेची छायांकित प्रत, सध्या शिकत असलेल्या इयत्तेचे बोनाफाईड सर्टीफिकेट, केंद्र/ राज्य शासनाची किंवा इतर
शिष्यवृत्ती मिळत नसल्याचा शाळा, महाविद्यालयाच्या प्राचार्यांचा दाखला, सीईटी,
जेईई किंवा इतर कारणासाठी गॅप घेऊन शैक्षणिक वर्ष 2023-24 प्रथम वर्षासाठी प्रवेश
घेतलेला आहे, अशा पाल्यांना प्रकरणांसोबत गॅप सर्टीफिकेट (स्वयंघोषणा पत्र) घेऊन
शिष्यवृत्तीची मंजूरी द्यावी. तसेच माजी सैनिक ओळखपत्राची छायांकित प्रत,
डिस्चार्ज पुस्तकात कुटुंबाची नावे
असलेल्या पानाची किंवा राशन कार्डची छायांकित प्रत, मुलीचे वय 18 पेक्षा जास्त
असल्यास मुलगी अविवाहित असल्याचा
ग्रासेवकाचा दासखला , आर्थिक मदतीच्या पिवळ्या कार्डची छायांकित प्रत (दोन्ही बाजू) , राष्ट्रीयकृत बँक
पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत , आधार कार्ड इत्यादी कागदपत्रे सोबत
जोडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
******
No comments:
Post a Comment