17 September, 2023

 

संत नामदेव  पोलीस कवायत मैदानावर मराठवाडा मुक्तीलढ्याच्या दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनाचे रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते उद्घाटन

 

 




हिंगोली (जिमाका), दि. 17 : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त येथील संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर जिल्हा प्रशासनामार्फत दुर्मिळ छायाचित्राचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.

यावेळी आमदार संतोष बांगर, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे, अरुणा टाकळगव्हाणकर, तेजस्विनी टाकळगव्हाणकर, हर्षल टाकळगव्हाणकर उपस्थित होते.

या प्रदर्शनामुळे हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांना मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास सचित्र स्वरुपात समजून घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या प्रदर्शनात मुक्ती संग्रामातील विविध घटना, प्रसंगांची दुर्मिळ छायाचित्रे, चरखा आदीचे संकलन करण्यासाठी इतिहास अभ्यासक वामनराव टाकळगव्हाणकर, संजय टाकळगव्हाणकर, विठ्ठल सोळंके यांनी महत्वपूर्ण भूमिका बजाविली आहे.

जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रदर्शनास भेट देऊन मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाणून घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

 

*****

No comments: