12 September, 2023

 

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमात

संबंधित विभागाने आपणास दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

* मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध उपक्रम राबविण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना


 

 

हिंगोली (जिमाका), दि. 12 : येत्या 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा 75 वा वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे. याप्रसंगी आपणास दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज केले.

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण आणि हुतात्म्यांना अभिवादन करण्याच्या अनुषंगाने येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पूर्वतयारीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी स्वप्नील पवार, तहसीलदार नवनाथ वगवाड, जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार आणि सर्व संबंधित विभागातील अधिकारी उपस्थित होते.

मराठवाडा मुक्ती दिनाचा मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम 17 सप्टेंबर रोजी  सकाळी 8.40 वाजता देवडा नगर येथील नगर परिषद उद्यानात उभारलेल्या स्मृतीस्तंभास मान्यवरांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्याचा कार्यक्रम होईल व त्यानंतर तेथेच सकाळी 9.00 वाजता राष्ट्रध्वज वंदन समारंभ होणार आहे.

तसेच मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध उपक्रम घेण्याच्या सूचना सर्व संबंधित विभागाला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यावेळी दिल्या. 

कार्यक्रम स्थळी नागरिकांच्या आसनाची व्यवस्था, परिसर स्वच्छता, आणि सॅनिटायझेन करण्याची जबाबदारी नगर परिषदेची असेल. लाऊड स्पीकर व शामियाना लावण्याबाबत कार्यवाही सार्वजनिक बांधकाम विभागाने तर विद्युत विभागाने त्या दिवशी विज पुरवठा सुरळीत राहील याची काळजी घ्यावी. तसेच कार्यक्रमस्थळी आरोग्य पथक आणि रुग्णवाहिका तत्पर असणे अपेक्षित असल्याचेही जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी यावेळी सांगितले.

****

No comments: