तोंडापूर कृषी विज्ञान केंद्रात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेअंतर्गत
प्रशिक्षण
हिंगोली (जिमाका), दि.
30 : कृषी विज्ञान
केंद्र, तोंडापूर येथे दिनांक 29 सप्टेंबर, 2023 रोजी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेअंतर्गत
प्रशिक्षण कार्यक्रम वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. पी. पी. शेळके यांच्या
मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी कृषी
विज्ञान केंद्राचे विशेषज्ञ (कृषी विस्तार) डॉ. अतुल मुराई विषय, विषय विशेषज्ञ (मृदा शास्त्र) साईनाथ खरात, कार्यालयीन अधीक्षक विजय ठाकरे उपस्थित होते.
या प्रशिक्षणामध्ये विषय विशेषज्ञ (कृषी विस्तार) डॉ. अतुल मुराई यांनी
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेअंतर्गत विविध योजना व उपक्रम याविषयी
प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण दिले. तसेच विषय विशेषज्ञ (उद्यानविद्या) अनिल ओळंबे यांनी हळद प्रक्रिया उद्योग यामध्ये पॅकिंग, काढणी पश्चात प्रक्रिया, याबद्दल सविस्तर प्रशिक्षण दिले. विषय विशेषज्ञ
(मृदा शास्त्र) साईनाथ खरात यांनी
अन्नप्रक्रियेचे महत्व व प्रमाणिकरण यामध्ये उद्यम आधार,
(FSSAI) नोंदणी प्रक्रिया, ट्रेड मार्क नोंदणी, जि. एस. टी. नोंदणी याबाबत सविस्तर
प्रशिक्षण दिले. विषय विशेषज्ञ (कृषिविद्या) राजेश भालेराव यांनी सोयाबीन पिकावरील प्रक्रिया उद्योग तंत्रज्ञान व उद्योग
क्षेत्रातील नाविन्यपूर्ण संकल्पनेचा विचार करुन
प्रशिक्षणार्थींना उद्योग करण्यास प्रोत्साहित केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
विषय विशेषज्ञ (मृदा शास्त्र) साईनाथ खरात यांनी तर आभार
प्रदर्शन विषय विशेषज्ञ (कृषी विस्तार) डॉ. अतुल मुराई यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ओमप्रकाश गुडेवार, गुलाबराव सूर्यवंशी, संतोष हनवते, प्रेमदास जाधव
यांनी सहकार्य केले.
*******
No comments:
Post a Comment