13 September, 2023

 

मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव वर्षनिमित्त

दिव्यांगाच्या विविध कलागुण स्पर्धा व स्वंयरोजगार मार्गदर्शन शिबीर संपन्न

 





हिंगोली, (जिमाका) दि. 13  :  येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे समाज कल्याण विभाग व दिव्यांग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगांच्या विविध कला गुण स्पर्धा व दिव्यांगांना स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबीर संपन्न झाले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण राजीव एडके, ज्ञानेश्वर ठाकरे, धनराज कदम, किशन मुटकुळे, कावरखे, नागेश गुठे, विजय कांबळे, सुधाकर वाढवे, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे सुधीर आठवले इत्यादीची उपस्थिती होती.

प्रारंभी  मान्यवरांच्या हस्ते थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात करुन दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक समाज कल्याण आयुक्त राजीव एडके यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. बोरा यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. वायचळ यांनी केले.

यावेळी  चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा घेण्यात येऊन शेतकरी आत्महत्या कारणे व उपाय तसेच दिव्यांग कलावंत यांचे विविध कला गुण प्रदर्शन, नृत्य गायन वादन, एक पात्री नाटक, भारुड व दिव्यांगांना  स्वयंरोजगारविषयी मार्गदर्शन करण्यात आले.  महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे सुधीर आठवले व रेनबो कॅम्पुटरचे प्राचार्य विजय कांबळे यांनी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला जिल्ह्यातील दिव्यांग विद्यार्थी, सर्व दिव्यांग विद्यार्थिनी, जिल्हा परिषदचे कर्मचारी, बार्टीचे कर्मचारी, जात पडताळणीचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री. मुंडे,  श्री. राणे, श्री.पिंगळकर,, सिद्धार्थ गोंदे,अशोक इंगोले, सुरेश पठाडे,  श्री.खंदारे, श्री.नागरे, शुभम यादव, श्री. जाधव, पहुलकर, पुंडगे पिंपरे मामा यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती .

******

No comments: