भटक्या व विमुक्त जमातीसाठी नवीन मतदार नोंदणी, राशन कॉर्ड,
जातीचे प्रमाणपत्र व
आधार कॉर्ड काढण्यासाठी कोथळज येथे शिबिराचे आयोजन
·
जिल्हाधिकारी
जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते गरजूंना राशन कार्ड, विविध प्रमाणपत्राचे वाटप
हिंगोली (जिमाका),दि. 21 : राज्याचे मुख्य निवडणुक अधिकारी यांच्या
निर्देशनानुसार आज हिंगोली तालुक्यातील मौ.कोथळज येथे भटक्या व विमुक्त
जमातीसाठी नवीन मतदार नोंदणी, फॉर्म नंबर 6 भरुन घेणे, राशन कॉर्ड वाटप करणे,
जातीचे प्रमाणपत्र व आधार कॉर्ड काढणे संबंधी
शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या
कार्यक्रमात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
यांच्या हस्ते गरजू लोंकाना राशनकॉर्ड, विविध प्रमाणपत्रे वाटप करण्यात आले. तसेच मतदार
यादीमध्ये नाव नसलेले मतदारांचे फॉर्म भरुन घेण्यात आले. आधार कॉर्ड संबंधी नोंदी घेण्यात
आल्या. तसेच भटक्या जमातीसाठी शासनातर्फे पुरविण्यात येणाऱ्या सोयीसुविधा बाबत सविस्तर
चर्चा करुन त्यांना मागदर्शन करण्यात आले.
यावेळी
कार्यक्रमास उपजिल्हा निवडणुक अधिकारी संतोष राऊत, तहसीलदार नवनाथ वगवाड, निवडणुक विभागातील
कर्मचारी गोळेगावकर, कुबडे, सोनटक्के, जाधव, पंजरकर, पोलीस पाटील साईनाथ शिंदे, मंडळ
अधिकारी श्रीमती एस. एम. आरगडे, तलाठी अमोल घोंगडे, सरपंच श्रीमती भुक्तर, ग्रामसेवक
एस. एन. बांगर, मुख्याध्यापक सावके आदी अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी उपस्थित होते.
*****
No comments:
Post a Comment