प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगामासाठी विम्याचा हप्ता
भरलेल्या व
पावसाने नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांनी त्याबाबतचे दावे तात्काळ
दाखल करावेत
हिंगोली (जिमाका), दि. 27
: राज्यात खरीप हंगामात पिक विमा योजना
राबविण्यासाठी क्ल्स्टरनिहाय विमा कंपन्याची निवड करण्यात आली आहे. हिंगोली
जिल्ह्यासाठी एचडीएफसी इर्गो जनरल इंन्शूरंस कंपनी लि. मुंबई या कंपनीची निवड
करण्यात आली आहे. खरीप हंगाम खरीप ज्वारी, तूर, मूग, उडीद, कापूस व सोयाबीन या
पिकांना विमा संरक्षण उपलब्ध आहे.
चालू खरीप-2023 हंगामात अतिवृष्टी, पूर इत्यादी कारणामुळे स्थानिक
नैसर्गिक आपत्ती व काढणी पश्वात नुकसान या जोखमीसाठी विमा संरक्षण उपलब्ध आहे.
यासाठी शेतकऱ्यांना विमा कंपनीकडे इंटिमेशन देण्यासाठी विविध पयार्याचा वापर करुन
योजने सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी घटना घडल्यापासून 72 तासाच्या आत नुकसानीबाबतची
सूचना संबंधित विमा कंपनी, संबंधित बँक, कृषि, महसूल विभाग किंवा टोल फ्री
क्रमांकाद्वारे देण्यात यावी.
सर्व प्रथम क्रॉप इन्शूरंस (Crop Insurance) पिक विमा ॲपचा वापर
करण्यात यावा. नंतर संबंधित विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांक 1800-266-0700 चा
वापर करण्यात यावा. टोल फ्री क्रमांक उपलब्ध न झाल्यास झालेल्या आपत्तीची माहिती
विमा कंपनीचे तालुका, जिल्हास्तरीय कार्यालय किंवा ते उपलब्ध न झाल्यास बँक, कृषि
व महसूल विभाग यांना द्यावी. तसेच विमा कंपनीसही तात्काळ माहिती देण्यात यावी.
बँकेमार्फत विमा संरक्षित बाबी जसे पिक विमा संरक्षित रक्कम, भरलेला विमा हप्ता व
त्यांचा दिनांक या बाबी तपासून संबंधित विमा कंपनीस सर्वेक्षणाची कार्यवाही
करण्यासाठी पाठविल्या जातील. इंटिमेशन देण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
सध्या चालू असलेल्या पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यांनी स्थानिक
नैसर्गिक आपत्ती व काढणी पश्चात नुकसान या जोखमीचा लाभ मिळण्यासाठी इंटिमेशन दाखल
करणे अनिवार्य आहे.
त्यामुळे विम्याचा हप्ता (प्रिमियम) भरलेल्या व पावसाने नुकसान झालेल्या
सर्व शेतकऱ्यांनी त्याबाबतचे दावे (इंटिमेशन) तात्काळ दाखल करावेत, असे आवाहन
जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
******
No comments:
Post a Comment