जिल्ह्यातील लम्पी रोगाच्या पार्श्वभूमीवर
पोळा सण घरगुती स्वरुपात साजरा करण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 12 : जिल्ह्यात पाचही तालुक्यातील 72 ईपीसेंटर मध्ये गोवर्गीय पधुधन लम्पी
चर्मरोग या सांसर्गिक रोगाने बाधित झाल्याचे आढळून आले आहे. तसेच गोवर्गीय
पशुधनामध्ये मर्तुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने दि. 14 सप्टेंबर,
2023 रोजी बैल पोळा सणानिमित्त मोठ्या संख्येने गोवर्गीय पशुधन एकत्रित येत
असल्याने जिल्ह्यातील इतर निरोगी पशुधनास लम्पी चर्मरोग या सांसर्गिक रोगाचा
प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे
जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी प्राण्यांमधील संक्रमण व
सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, 2009 नुसार हिंगोली जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील
गोवर्गीय पशुधनाचे बैल पोळा सणानिमित्त एकत्रित येण्यास सक्त मनाई केली आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पशुपालक, शेतकरी यांनी बैल पोळा सण हा घरगुती स्वरुपात
साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी
केले आहे.
******
No comments:
Post a Comment