17 September, 2023

 

मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमास

रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 

मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या स्मृती जागृत ठेवून पुढच्या पिढीला माहिती देणे व त्याचे पावित्र्य जपण्यासाठी  विविध कार्यक्रमाचे आयोजन-जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

  • विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर सादर केलेले नृत्य ठरले लक्षवेधी 

 






 

हिंगोली (जिमाका), दि. 17 : मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय व शिक्षण विभागाच्या वतीने आज येथील शिवाजीराव देशमुख सभागृहात देशभक्तीपर गीत गायन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन करण्यात आले. या कार्यक्रमास रसिकांचा उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी आमदार संतोष बांगर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी स्वप्नील मोरे, शिक्षणाधिकारी सर्वश्री. माधव सलगर, संदीपकुमार सोनटक्के, तहसीलदार नवनाथ वगवाड, मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा वेगवेगळ्या स्मृती जागृत ठेवून पुढच्या पिढीला माहिती देण्यासाठी व त्याचे पावित्र्य जपण्यासाठी  मागील सात-आठ दिवसात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांत सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी केल्यामुळे सर्वांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली व सर्व विद्यार्थी, शिक्ष्कांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त जनतेच्या मनात मराठवाडा मुक्ती लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरुपी जनमानसात राहावी या मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सव अंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आपल्या प्रास्ताविकात दिली.

  यावेळी पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी देश रंगीला, रगीला, देश मेरा रंगीला, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भगवतीच्या शिक्षक विशाखा मोडक यांनी गगन सदन तेजोमय,  डोणवाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यानी मराठवाडा गीत, मेथा येथील केंद्रीय प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी संदेशे आते है, आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गोंधळ गीत, श्री साई माऊली विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी माय भवानी, इसापूर तांडा येथील विद्यार्थ्यांनी विरेना बंजारा गीत, अंबाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी जय हो.. रंग देत बसंती, फुटाणा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी शेतकरी गीत, कुरुंदा येथील नरहर कुरुंदकर प्राथमिक विद्यालयाचे विद्यार्थी गजर माऊलीचा, सिक्रेट हार्ट इंग्लीश हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी मेरे देश की धरती, माथा जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळेचे विद्यार्थ्यांनी इडा पिडा टळू दे, बळीचे राज्य येऊ दे, भगवतील येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी वंदे मातरम्, फाळेगाव येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीत, बोरखेडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी दैवत छत्रपती, सेलसुरा येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी देश रंगीला, सावा येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी जय भवानी तलवार, इसापूर तांडा व हिवरा बेल येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनी बंजारा तीज लोकनृत्य, कै. विठ्ठलराव घुगे माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी संथ वाहते गोदामाई असा आमचा मराठवाडा, एबीएम इंग्लीश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अंबे कृपा करी, पुसेगाव येथील जिलहा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी इंडिया वाले जय हो, गोळेगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी लल्लाटी भंडार, वाळकी जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी झेंडू हमारो भारतम् शान छे रे आदिवासी नृत्य, तहसील कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी बहिणाबाईची कविता अशी बहारदार नृत्ये सादर केली. तर तहसील कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामावर आधारित नाटिका सादर केली. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात संपूर्ण वातावरण देशभक्तीमय झाले होते. या वातावरणात विद्यार्थ्यांनी केलेल्या समूह नृत्याचे उपस्थित मान्यवरांनी कौतूक केले.  

 

वर्क्तृत्व, चित्रकला व निबंध स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण

 

मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सावानिमित्त आयोजित विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण आज मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये वर्क्तृत्व स्पर्धेमध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या गटात अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय आलेल्या प्रांजल गरुड, किरण हिरवे, आरती भोसले, इयत्ता पाचवी ते सातवीच्या गटामध्ये अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय नंदिनी बोखारे, दुर्गा शेळके, आंचल राऊत, आठवी ते दहावीच्या गटात अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय अलका खाडे, कांचन पूंड, प्रतिमा पठाडे, जिल्हास्तरीय ऑनलाईन प्रश्न मंजूषा स्पर्धेमध्ये इयत्ता पाचवी ते सातवीच्या गटात अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृत्तीय संध्या काळे, स्वीटी खंदारे, सोहम सानप, इयत्ता आठवी ते दहावीच्या गटामध्ये अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय शिवम वसेकर, अनिकेत मगर, धनंजय व्हडगीर यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळविलेल्या इयत्ता पहिलीची विद्यार्थी भाग्यश्री लांडे, दुसरीची विद्यार्थी राधिका लांडे, तिसरीचा विद्यार्थी शौर्य चव्हाण, चौथीचा विद्यार्थी अनमोल भोयर, पाचवीची विद्यार्थी मोहिनी काळे, सहावीची विद्यार्थी श्रुती जवंजाळ, सातवीची विद्यार्थी श्रेया आढळकर, आठवीची विद्यार्थी स्वरा बांगर, नववीची विद्यार्थी आश्लेषा पडोळे व दहावीची विद्यार्थिंनी धनश्री देवकत्ते यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. जिल्हास्तरीय निंबध स्पर्धेमध्ये प्रथम कमांक मिळविलेल्या इयत्ता तिसरीची विद्यार्थिंनी श्रेया शिंदे, पाचवीचा विद्यार्थी आर्यन कांबळे, सहावीचा विद्यार्थी नैतिक डुकरे, सातवीची विद्यार्थिंनी वैष्णवी पाणधोंडे, आठवीची विद्यार्थिंनी कोमल सावंत, नववीचा विद्यार्थी समर्थ केजकर आणि दहावीची विद्यार्थिंनी प्राची नागरे यांचा प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.     

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक कोकरे व आश्विनी कुरुंदकर यांनी केले. या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. यावेळी विविध पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थींनी, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेतला.

 

****

No comments: