जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या घरातील वंचित राहिलेल्या
बालकांचे
मिशन इंद्र धनुष्य 5.0 मोहिमेत लसीकरण करुन घ्यावेत
--- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
हिंगोली (जिमाका), दि. 07 : मिशन इंद्र धनुष्य 5.0 मोहीम मध्ये जिल्ह्यातील
नागरिकांनी आपल्या घरातील लसीकरण पासून वंचित राहिलेल्या बालकांचे या मोहीम कालावधीत प्राधान्याने
लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन जितेंद्र पापळकर
यांनी केले आहे.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा दक्षता समितीची बैठक आयोजित करण्यात आली
होती. यावेळी जिल्हाधिकारी श्री. पापळकर बोलत होते. या बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार,
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कैलास शेळके, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.विठ्ठल करपे, जिल्हा
माता बाल संगोपन अधिकारी डॉ.सतीश रुणवाल, वैद्यकीय
अधीक्षक डॉ.गजानन हरण, डॉ.गजानन चव्हाण, डॉ.अक्षय
मुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ,
समाज कल्याण अधिकारी राजू एडके, शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के, माधव सलगर, तालुका आरोग्य
अधिकारी डॉ. अनुराधा गोरे, डॉ सावंत उपस्थित होते.
यावेळी जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी
डॉ.सतीश रुणवाल यांनी बालकांमधील मृत्यू आजाराचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे एक
प्रभावी साधन आहे. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात,अर्धवट लसीकरण झालेल्या तसेच लसीकरण
न झालेली बालके ही पूर्ण लसीकरण झालेल्या बालकांपेक्षा लवकर आजारी पडतात किंवा मृत्यू
पावतात. केंद्र शासनाने डिसेंबर, 2023 पर्यंत गोवर रुबेला आजाराची दुरीकरण करण्याचे
ध्येय निश्चित केले आहे. यासाठी केंद्र शासनाने माहे ऑगस्ट, 2023 पासून तीन फेऱ्यांमध्ये सर्व जिल्ह्यात विशेष मिशन इंद्रधनुष्य 5.0 कार्यक्रम हाती घेतला
आहे. या मोहिमेत लसीकरणापासून पूर्णपणे वंचित राहिलेली किंवा अर्धवट लसीकरण झालेल्या
सर्व बालकांचे लसीकरण करुन घेण्यात येणार आहे. हे लसीकरण तीन टप्प्यात करण्यात येणार
आहे. त्यापैकी एक टप्पा राबविण्यात आला आहे. त्यानंतर आत्ता दुसरा महिना 11 ते 16 सप्टेंबर,
2023 तिसरा महिना 9 ते 14 ऑक्टोबर,2023 ही मोहीम प्रत्येक महिन्यात सहा कामकाजाच्या
दिवसांमध्ये राबविण्यात येईल. या मोहिमेमध्ये लाभार्थीची निवड 0 ते 2 वर्ष (0 ते 23 महिने ) वयोगटातील लसीकरणापासून
वंचित किंवा गळती झालेल्या लाभार्थ्याचे सर्व लस्सीद्वारे लसीकरण करणे, 2 ते 5 वर्ष वयोगटातील ज्या बालकांचे गोवर रुबेला
लसीचा पहिला व दुसरा डोस राहिला असेल तसेच डी पी टी व ओरल पोलिओ लसीचा बूस्टर डोस राहिला
असेल त्यांचे लसीकरण करणे. गर्भवती महिलांना लसीकरण कार्यक्रमांतर्गत दिले जाणाऱ्या
लहरी लसीकरण करणे. तसेच 6 ऑगस्ट, 2018 किंवा त्यानंतर जन्मलेल्या बालकाचा यामध्ये समावेश
असेल, अशी माहिती दिली.
यावेळी व्हीसीसीएम श्री नागर, आरोग्य
सहाय्यक डी. आर. पारडकर, डाटा ऑपरेटर मुनाफ, महिला बालकल्याण विभाग, शिक्षण विभाग,
आरोग्य विभाग, समाजकल्याण विभाग इत्यादी विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
******
No comments:
Post a Comment