इच्छाशक्ती, जिद्द आणि बँक व महामंडळाच्या सहकार्यामुळे
सुदाम
पारोकर यांनी फोटोग्राफी
व्यवसायात केली प्रगती
हिंगोली येथील रहिवाशी सुदाम ऊर्फ बालाजी
पारोकर यांना पदवीचे शिक्षण घेत असतांना आर्थिक अडचणीचा खूप सामना करावा लागत असे.
श्री. पारोकर यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचा लाभ भेटत असल्याचे
कळाल्यानंतर श्री. पारोकर यांनी हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीत
असलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला भेट दिली. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी
श्री. पारोकर यांना महामंडळाच्या योजनेची सविस्तर माहिती दिली. ती माहिती ऐकल्यानंतर
श्री. पारोकर यांनी त्यांचा आवडता छंद असलेला अभय फोटो स्टुडिओ, नांदेड रोड, निधी कॉम्पलेक्स,
हिंगोली येथे फोटोग्राफीचा व्यवसाय करण्यास सुरुवात केली. व्यवसाय सुरु केल्यानंतरही
त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत होता.
त्यामुळे श्री. पारोकर यांनी अण्णासाहेब
पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडे वैयक्तीक व्याज परतावा योजनेमध्ये अर्ज केला. पात्रता प्रमाणपत्र मिळाल्यानंतर
श्री. पारोकर यांनी बँकेकडे धाव घेतली. कर्ज प्रस्ताव मंजूर करताना त्यांना बऱ्याच
अडचणी आल्या. अशावेळी त्यांना महामंडळाच्या कार्यालयाकडून मोलाचे सहकार्य करण्यात आले.
त्यानंतर श्री. पारोकर यांनी ॲक्सिस बँकेतून अभय फोटो स्टुडिओ या व्यवसायासाठी 11 लाख
रुपयांचे कर्ज घेतले. सुरुवातीला त्यांचा व्यवसाय छोटा होता. बँकेकडून मिळालेली सर्व
रक्कम त्यांनी व्यवसायात गुंतवली. बँकेकडून आर्थिक लाभ मिळाल्यानंतर श्री. पारोकर यांचा
फोटोग्राफीचा व्यवसाय भरभराटीस आला. बँकेने दिलेल्या कर्जाचा व्याज परतावा म्हणून अण्णासाहेब
पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने 2 लाख 31 हजार रुपये व्याज परतावा रक्कम मंजूर
केले. त्यामुळे इच्छाशक्ती, जिद्द आणि बँकेचे व महामंडळाच्या सहकार्यामुळे त्यांच्या
व्यवसायात प्रगती करत शून्यातून विश्व निर्माण करणे शक्य झाले असल्याचे श्री. पारोकर
सांगतात.
महामंडळाने कर्ज उपलब्ध करुन दिल्यामुळे
महामंडळाचे अध्यक्ष श्री.नरेंद्र पाटील, इतर महामंडळाचे संचालक, कर्मचारी यांचे सहकार्य
लाभल्यामुळेच हे शक्य झाले असल्याचे सांगून त्यांनी सर्वांचे आभार मानले.
-
चंद्रकात स. कारभारी
माहिती सहायक/उपसंपादक,
जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली
*******
No comments:
Post a Comment