महास्वयम् वेबपोर्टल वर
येणाऱ्या अडचणी व तक्रारीची नोंद
हेल्पलाईन क्रमांक 18001208040
वर करण्याचे आवाहन
हिंगोली, (जिमाका) दि. 15: कौशल्य , रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत महास्वयम पोर्टलच्या
विविध लाभार्थी घटक जसे उमेदवार, उद्योजक , नियोक्ते यांनी www.mahaswayam.gov.in या संकेत स्थळावर नोंदणी करणे, नोंदणीचे
अद्ययावतीकरण करणे, रिक्तपदे अधिसूचित करणे, रिक्त पदास अनुसरुन अप्लाय करणे,
राज्यातील युवक व विद्यार्थी यांना करिअर विषयक संधीची माहिती, रोजगार मेळावे व
रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम यामध्ये इच्छुकता
दर्शविणे , विविध प्रशिक्षण संस्था,
स्टार्टअप इत्यादी विविध ऑनलाईन सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत.
या ऑनलॉईन सेवा घेताना लाभार्थी घटकांना
येणाऱ्या अडचणी, तक्रारीचे निराकरण
करण्यासाठी मुख्यमंत्री हेल्पलाईन अंतर्गत सुरु करण्यात आले आहे. या
हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक 18001208040 असा आहे. या हेल्पलाईनची वेळ सकाळी 8 ते
रात्री 8.00 वाजेपर्यंत आहे.
महास्वयम वेबपोर्टलच्या सर्व लाभार्थीना
वेब पोर्टलवर येणाऱ्या अडचणी व तक्रारीची नोंद करण्यासाठी हेल्पलाईन 18001208040
या टोल फ्री क्रमांकाचा वापर करावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता
विभागाचे सहायक आयुक्त डॉ. राजपाल कोल्हे यांनी केले आहे.
******
No comments:
Post a Comment