हिंगोली नगर पालिकेच्या वतीने आयोजित कलश यात्रेचे
आई जगदंबा प्रतिष्ठानच्या वतीने स्वागत
हिंगोली, (जिमाका) दि. 15 : स्वातंत्र्याच्या
अमृत महोत्सव व मराठवाडा मुक्ती दिनाच्या अमृत महोत्सवा निमित्त हिंगोली नगर पालिकेच्या
वतीने शहरात कलश यात्रा काढण्यात आली. या कलश यात्रेचे स्वागत एनटीसी परिसरातील आई
जगदंबा उत्सव समितीच्या महिला भगिनींनी भव्य स्वागत केले.
स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव व मराठवाडा मुक्ती दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त
आज दुपारी 12.00 वाजता हिंगोली नगर पालिकेच्या
वतीने मेरी माटी मेरा देश अमृत कलश यात्रेचे आगमन शहरातील एनटीसी परिसरातील छत्रपती
शिवाजी राजे उद्यानात आगमन झाले. यावेळी आई जगदंबा उत्सव समितीच्या महिला भगिनींनी
रथावरील भव्य कलशात माती व धान्य टाकले. यावेळी योगिताताई देशमुख, मिराताई कोरडे, कमलाताई
यादव, अणिताताई शिंदे, जगजित कौरताई अलग, मनिषाताई कदम, बलवंत कौरताई अलग, दमकोंडवार
ताई, प्रणिताताई डोंगरे, वंदनाताई धुत व महिला भगिनी उपस्थित होत्या. अमृत कलश यात्रेत भव्य रथ, जनजागृती
वाहनाचा समावेश असून शहरात पालिकेच्या वतीने मेरी माटी मेरा देश हे अभियान मुख्याधिकारी
अरविंद मुंढे यांच्या पुढाकाराने पालिकेचे कर्मचारी शिवाजी घुगे, विनय साहू, मनोज बुर्से,
शेख साजीद यांच्यासह अधिकारी व कर्मचारी परिश्रम घेत आहेत.
****
No comments:
Post a Comment