15 September, 2023

 

पीएम स्कील रन मॅरेथॉन स्पर्धेचे  आयोजन

 

हिंगोली (जिमाका), दि. 15 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 17 सप्टेंबर , 2023 रोजी सकाळी 7 ते 8 या वेळेत सर्व जिल्हास्तर, तालुकास्तरावर औद्योगिक  प्रशिक्षण संस्था, हिंगोली, सेनगाव, वसमतनगर, कळमनुरी, औंढा नागनाथ, जामगव्हाण अशा एकूण सहा ठिकाणाहून पीएम स्कील रन मॅरेथॉन स्पर्धेचे  आयोजन केलेले आहे. स्पर्धेची सुरुवात प्रत्येक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेपासून करण्यात येईल.  संपूर्ण दौड 5 किलोमिटरची असेल स्पर्धेचा शेवट औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये करण्यात येईल. या स्पर्धेत भाग  घेतलेल्या एकूण पुरुष व महिला प्रत्येकी तीन विजेत्यांची निवड करण्यात येणार आहे.  विजेत्यांना प्रथम पारितोषिक 3 हजार रुपये, द्वितीय 2 हजार रुपये आणि तृतीय 1 हजार रुपये  असे बक्षीस देण्यात येणार आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी जिल्ह्यातील 16 वर्षावरील सर्व स्त्री व पुरुष या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.

या स्पर्धेत औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शासकीय तांत्रिक विद्यालये, खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शाळा , महाविद्यालये प्रमाणपत्र अभ्यासक्रम  संस्था मधील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा. पीएम स्कील रन मॅरेथॉन स्पर्धेच्या माध्यमातून व्यवसाय शिक्षणाचे महत्व जाणून कौशल्य आत्मसात करुन रोजगार व स्वयंरोजगार करुन देशाच्या प्रगतीत  हातभार लावावे, असे आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी विशाल रांगणे यांनी केले आहे.

ही स्पर्धा पार पडल्यावर भारत सरकारचे रोजगार व उद्योजकता विभागाने दिलेल्या निर्देशानुसार प्रत्येक वर्षी सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पदवीदान समारंभ  आयोजित करण्यात आलेला आहे. अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या व व्यवसाय  निहाय प्रथम, द्वितीय, तृतीय उमेदवारांचा पालकांसह सत्कार करण्यात येणार आहे.

तसेच महात्मा गांधीच्या 154 व्या जयंती निमित्त व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अंतर्गत या विभागाच्या अधिपत्याखालील सर्व संस्था व कार्यालयामध्ये स्वच्छता , परीरक्षण दिनांक 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2023 या पंधरवडा कार्यक्रमाचे उद्घाटन मा.मंत्री महोदयांचे हस्ते  ऑनलाईन पध्दतीने उद्घाटन होणार आहे.

*****

No comments: