18 September, 2023

 

मराठवाडा मुक्ती संग्रामात हिंगोली जिल्ह्याचे योगदान कॉफीटेबल बुकचे

रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते विमोचन


 

 

हिंगोली (जिमाका), दि. 18 : मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाने मराठवाडा मुक्ती संग्रामात हिंगोली जिल्ह्याचे योगदान या विषयावर तयार केलेल्या काफी टेब्ल बुकचे विमोचन राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी आमदार तानाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, निवासी उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे, उपजिल्हाधिकारी स्वप्नील मोरे, संजय टाकळगव्हाणकर, वामनराव टाकळगव्हाणकर, विठ्ठल सोळंके उपस्थित होते.

*****

No comments: