सोयाबीन पिकावरील कीड व्यवस्थापनाबाबत
वडगाव येथील शेतीशाळेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन
हिंगोली, (जिमाका) दि. 01 : येथील कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान
व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व तोंडापूर येथील कयाधू फार्मर्स प्रोड्युसर कंपनी
यांच्या संयुक्त विद्यमाने मा.बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन
प्रकल्प (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत सोयाबीन पिकावर शेतकरी शेतीशाळा आज वडगाव येथे घेण्यात आली.
ही शेतीशाळा स्मार्ट प्रकल्पाचे नोडल
अधिकारी जी. बी. बंटेवाड, तोंडापूर कृषि विज्ञान केंद्राचे मृदशास्त्रज्ञ एस. पी.
खरात व पुरवठा व मूल्य साखळीतज्ञ गणेश कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित
करण्यात आली होती.
यावेळी शेतीशाळेत सोयाबीन पिकावरील कीड,
रोग व त्यावरील उपाय, फवारणी करताना संरक्षण किटचा वापर करणे, एकात्मिक अन्नद्रव्य
व एकात्मिक कीड व्यवस्थापन, स्मार्ट प्रकल्प अंतर्गत हवामान अनुकूल पद्धती वापर व
प्रात्यक्षिक दाखवून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापन
ए.एस.निकम, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक रमेश सरनायक व शेतकरी हजर होते.
*****
No comments:
Post a Comment