16 September, 2023

 

रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते

17 सप्टेंबर रोजी मुख्य शासकीय ध्वजारोहण

 

 

हिंगोली, (जिमाका) दि. 16  :  मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त रविवार, दि. 17 सप्टेंबर रोजी सकाळी 9.00 वाजता देवडा नगर येथील उद्यानात असलेल्या हुतात्मा स्मारक स्मृतीस्तंभ येथे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार आहे.

सकाळी 8.40 वाजता मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त  देवडा नगर येथे उभारण्यात आलेल्या स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करण्यात येईल व मानवंदना देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

******

No comments: