16 September, 2023

 

मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त

आयोजित चालण्याच्या स्पर्धेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 




हिंगोली, (जिमाका) दि. 16  :  मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा प्रशासनाने आयोजित केलेल्या चालण्याच्या स्पर्धेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हिंगोली क्रीडा भारतीचे अध्यक्ष डॉ. संजय नाकाडे व तहसीलदार नवनाथ वगवाड यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानावरुन चालण्याच्या स्पर्धेला सुरुवात झाली.

यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार, नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी आशिष पंत, कुस्तीचे आंतरराष्ट्रीय पंच तथा छत्रपती पुरस्कार प्राप्त प्रा. बंकट यादव, आंतरराष्ट्रीय खेळाडू नितीन चव्हाण, हिंगोली जिल्हा ॲथलेटीक्स संघटनेचे सचिव रमेश गंगावणे, क्रीडा अधिकारी आत्माराम बोथीकर उपस्थित होते .

ही चालण्याची स्पर्धा पुरुष खुला गट, महिला खुला गट, 45 वर्षावरील पुरुष गट, 45 वर्षावरील महिला गट यांच्यासाठी 3 कि.मी. चालणे अशी आहे. ही स्पर्धा जिल्हा परिषद कन्या शाळा येथून सुरुवात होऊन पिपल्स बँक-जुनी नगर परिषद-खुराणा पेट्रोलपंप-जवाहर रोड-इंदिरा चौक-अग्रसेन चौक- एमजीपी पाण्याची टाकी-जिल्हा परिषद कन्या प्रशाला येथे समारोप करण्यात आला.

महिला खुला गटातून प्रिंयका पाईकराव, पुरुष खुला गटातून सुनिल खडसे विजेते

45 वर्षावरील महिला गटातून वंदना बंगाळे तर पुरुष गटातून सय्यद अनिस ठरले विजेते

 

जिल्हा प्रशासनाच्यावतीने आयोजित  चालण्याच्या स्पर्धेत महिला खुला गटात प्रियंका पाईकराव, पुरुष खुला गटात सुनिल खडसे, 45 वर्षावरील महिला गटात वंदना बंगाळे आणि 45 वर्षावरील पुरुष गटात सय्यद अनिस यांनी विजेतपद पटकाविले.

महिला खुल्या गटात अंकिता गव्हाणे द्वितीय, सोनाली ढेंबरे तृतीय, ऋतीका राठोड चौथी, ऋतुजा राठोड पाचवी आणि पल्लवी मुहाडे यांना प्रोत्साहनवर विजेते ठरले आहेत. पुरुष खुल्या गटात संतोष कैलसा मिरासे द्वितीय, युवराज नारायण राठोड तृतीय, शुभम पुंडकर यांचा चौथा क्रमांक आला आहे. 45 वर्षावरील महिला गटात ज्योती शेळके द्वितीय, अनिता पाटील तृतीय, अंजली आडगावकर चौथी व उर्मिला खंडेलवाल यांचा पाचवा क्रमांक आला आहे. 45 वर्षावरील पुरुष गटात देविदास राठोड द्वितीय, गगन भट तृतीय, आनंद पठाडे चौथा, रजनीश ठाले पाचवा, उमेश तोष्णीवाल सहावा, बालासाहेब हरण सातवा, राजेंद्र बंगाळ आठवा, मनोज हलवाई नववा, सुधाकर वाढवे दहावा, गोविंद थोरात  अकरावा, उमेश बाणेर बारावा आणि ओमप्रकाश संदुख यांचा तेरावा क्रमांक आला आहे. या सर्व विजेत्यांना मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमानंतर मंत्रीमहोदयांच्या हस्ते पारितोषिकाचे वितरण होणार आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पोलीस पथक, वैद्यकीय पथक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

या चालण्याच्या स्पर्धेमध्ये हिंगोलीतील युवक, खेळाडूंसह विद्यार्थी, महिला, शासकीय अधिकारी व कर्मचारी यावेळी मोठ्या संख्यने उपस्थित होते.

*****

No comments: