मराठवाडा मुक्तिसंग्राम
अमृत महोत्सवानिमित्त
दाती व वापटी येथे स्मृतीस्तंभ
उभारणार
हिंगोली, (जिमाका) दि. 15 : मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवानिमित्त शेंबाळपिंप्री कँपचे प्रमुख थोर
स्वातंत्र्य सेनानी दिपाजी पाटील यांच्या स्मरणार्थ कळमनुरी तालुक्यातील दाती येथे
स्मृती स्तंभ उभारण्यात येणार आहे. तर आजेगावच्या रणसंग्रामात हुतात्मा झालेले बर्हिजी
शिंदे यांच्या स्मरणार्थ वसमत तालुक्यातील वापटी येथे जिल्हा प्रशासनातर्फे स्मृती
स्तंभ उभारण्यात येणार आहेत.
या स्मृती स्तंभाच्या परिसरात बागकाम, पेव्हर ब्लॉकचे काम,
स्मृती स्तंभाच्या ओट्यावर स्वातंत्र्य सेनानीचे छायांकित टाईल्स बसविण्यात येणार आहे.
तसेच स्मृती स्तंभाच्या ओट्यावर ग्रेनाईट बसविण्यात येणार आहेत. च्या वरील बाजूस स्वातंत्र्य
सैनिकांचे नावे लिहिली जाणार आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
******
No comments:
Post a Comment