08 September, 2023

 

मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध क्रीडा स्पर्धाचे आयोजन

स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 08 : मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त हिंगोली येथे विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

दि. 12 सप्टेंबर, 2023 रोजी सकाळी 7.00 वाजता सायकल रॅलीचे आयोजन केले असून ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयापासून निघणार आहे. यामध्ये खेळाडू, शालेय विद्यार्थी, महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक सहभागी होणार आहेत.

दि. 13 सप्टेंबर रोजी सकाळी 10.00 वाजता लिंबाळा मक्ता येथील क्रीडा संकुलावर कुस्ती क्रीडा स्पर्धा-फ्री स्टाईलचे आयोजन करण्यात आले आहे. या कुस्ती स्पर्धा वजन गटानुसार घेण्यात येणार आहेत.

 दि. 15 सप्टेंबर, 2023 रोजी सकाळी 7.00 वाजता पाच किमी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ही स्पर्धा खटकाळी बायपास ते अकोला बायपास रोड अशी घेण्यात येणार आहे. या मॅरेथान स्पर्धेमध्ये पुरुष 5 कि.मी. व महिला 3 कि.मी. धावण्याची स्पर्धा घेण्यात येणार आहे.

दि. 16 सप्टेंबर, 2023 रोजी सकाळी 7.00 वाजता येथील संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर तीन कि.मी. चालण्याची स्पर्धा घेण्यात येणार आहे. ही स्पर्धा 45 वर्षावरील पुरुषाकरिता 3 कि.मी. व महिलांकरिता 2 कि.मी. व युवक-युवतीसाठी 3 कि.मी. याप्रमाणे चालण्याच्या स्पर्धा होणार आहेत.

या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील युवक, युवती, खेळाडू, ज्येष्ठ नागरिक या सर्वांनी सहभागी होण्यासाठी स्पर्धेच्या एक दिवस अगोदर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे नोंदणी करावी. सोबत वयाचा दाखला सादर करणे अनिवार्य राहील, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार यांनी केले आहे.

******

No comments: