मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित
लोककला व पथनाट्याच्या माध्यमातून मराठवाडा मुक्ती संग्रामाचा
होणार जागर
हिंगोली (जिमाका), दि. 07 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवाच्या
निमित्ताने हिंगोली जिल्ह्यातील स्थानिक कलाकारामार्फत विविध परंपरागत लोककला सादरीकरणाचे
कार्यक्रम सर्व जिल्हाभर राबविण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने मराठवाडा मुक्ती संग्राम
अमृत महोत्सवाच्या निमित्ताने हिंगोली जिल्ह्यातील स्थानिक कलाकारामार्फत पोवाडा, पोतराज,
गोंधळी आदी विविध परंपरागत पथनाट्य व लोककला सादरीकरणाच्या माध्यमातून मराठवाडा मुक्ती
संग्रामाचा जागर होणार आहे.
हे कार्यक्रम कळमनुरी तालुक्यातील खरवड
येथील सूर्यप्रकाश बहुउद्देशीय सेवा संस्था, शिरड शहापूर येथील जय भवानी कलापथक आणि
संतुक पिंप्री येथील नॅशनल ॲकडमी मल्टीपरपज असोसिएशन या संस्थेमार्फत राबविण्यात येत
आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
यामध्ये
आज पहिला कार्यक्रम हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आला. तर दि. 8 सप्टेंबर
रोजी सकाळी 9 ते 11 हिंगोली तालुक्यातील कनेरगांव (नाका), सांय. 5 ते 7 वाजेपर्यंत
नर्सी नामदेव येथे होणार आहे. दि. 11 सप्टेंबर, 2023 रोजी सकाळी 9 ते
11 कळमनुरी शहरात तर सांय 5 ते 7 वाजता आखाडा बाळापूर येथे होणार आहे. दि. 12 सप्टेंबर, 2023 रोजी कळमनुरी
तालुक्यातील डोंगरकडा येथे सकाळी 9 ते 11 या दरम्यान तर औंढा नागनाथ तालुक्यातील शिरड
शहापूर येथे सांय. 5 ते 7 या वेळेत कार्यक्रम
होणार आहेत. दि. 13 सप्टेंबर, 2023 रोजी सेनगाव शहरात सकाळी 9 ते 11 या वेळेत तर सेनगाव
तालुक्यातील गोरेगाव येथे सांय. 5 ते 7 या वेळेत कार्यक्रम होणार आहेत. दि. 14 सप्टेंबर,
2023 रोजी सकाळी 9 ते 11 या कालावधीत औंढा नागनाथ शहरात तर औंढा नागनाथ तालुक्यातील
जवळाबाजार येथे सांय. 5 ते 7 या वेळेत कार्यक्रम होणार आहेत. दि. 15 सप्टेंबर,
2023 रोजी सकाळी 9 ते 11 वसमत शहरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. तर दुपारी
2 ते 4 या वेळेत वसमत तालुक्यातील कुरुंदा
येथे आणि सांय. 5 ते 7 या वेळेत गिरगाव येथे हिंगोली जिल्ह्यातील स्थानिक कलाकारामार्फत
पोवाडा, पोतराज, गोंधळी आदी विविध परंपरागत पथनाट्य व लोककला सादरीकरणाचे कार्यक्रम
घेण्यात येणार आहेत.
जिल्ह्यातील
जास्तीत जास्त नागरिकांनी या पथनाट्य व लोककला सादरीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी
जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.
******
No comments:
Post a Comment