08 September, 2023

 

हिंगोली जिल्ह्यातील बेकायदेशीर व अवैध कत्तलखाने

कायमस्वरुपी बंद करण्याचे आदेश

 

हिंगोली (जिमाका), दि. 08 : श्रावण वद्य 12 मंगळवार, दि. 12 सप्टेंबर, 2023 रोजी भाद्रपद शुक्ल 4 मंगळवार, दि. 19 सप्टेंबर, 2023 रोजी हिंगोली जिल्हाअंतर्गत येणाऱ्या सर्व ग्रामपंचायत, नगर परिषद हद्दीतील सर्व कत्तलखाने आणि मांस विक्री व साठवणूक केंद्र बंद ठेवण्यासाठी योग्य ते समुचित उपाययोजना करण्यात याव्यात.

तसेच आपल्या अखत्यारित असलेल्या परिक्षेत्रात सुरु असलेले बेकायदेशीर व अवैध कत्तलखाने आणि मांस विक्री, साठवणूक केंद्र कायम स्वरुपी बंद करण्यात यावेत, असे आदेश जिल्हादंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी पोलीस अधीक्षक, सर्व उपविभागीय दंडाधिकारी, मुख्याधिकारी नगर परिषद हिंगोली यांना दिले आहेत.

****

No comments: