12 September, 2023

 

मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवानिमित्त आयोजित भव्य सायकल रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ

 

हिंगोली (जिमाका), दि. 12 : मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व हिंगोली जिल्हा सायकल असोशिएशनच्या संयुक्त विद्यमाने भव्य सायकल रॅलीचे आयोजन येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मैदानावर करण्यात आले होते. या रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या सायकल रॅलीचा शुभारंभ जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला.

याप्रसंगी उपजिल्हाधिकारी स्वप्नील मोरे, छत्रपती पुरस्कारार्थी बंकट यादव, पोलीस निरीक्षक सोनाजी आमले, जिल्हा युवा अधिकारी अशिष पंत, स्काऊट आणि गाईडचे जिल्हा संघटक राजेश गावंडे, जिल्हा क्रीडा अधिकारी आर. एस.मारावार उपस्थित होते.

या रॅलीची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालय येथून अग्रसेन चौक इंदिरा गांधी चौक-महात्मा गांधी चौक-जवाहर रोड-खुराणा पेट्रोल पंप-जुनी नगर पालिका-संत नामदेव पोलीस कवायत मैदान येथे सायकल रॅलीचे समारोप कार्यक्रम संपन्न झाला.

या सायकल रॅलीमध्ये सेक्रेट हार्ट इंग्लीशस्कूल, सरजुदेवी भिकुलाल भारुका आर्य कन्या विदयालय, माणिक स्मारक विद्यालय, अनसुया विद्यामंदिर, श्रीमती शांताबाई मुजांजी दराडे मा. विद्यालय, आदर्श विद्यालय, हिंगोली जिल्हा कराटे असोशिएशन, हिंगोली जिल्हा मैदानी असोशिएशन, एकता युवा स्पोर्टस फाऊंडेशनचे खेळाडू विद्यार्थी सहभाग घेतले. या सायकल रॅलीमध्ये शालेय विद्यार्थी, खेळाडू, क्रीडा प्रेमी व ज्येष्ठ नागरिक असे जवळपास 400 सायकलपटुने सहभाग घेतला.

सायकल रॅलीसाठी रुट गाईड म्हणून प्रा. उमेश वांगर, सोपान नाईक, लोळेवार सर, शिवाजी इंगोले, सुनिल सुकणे, रावसाहेब गैंडाफळे, संजय भुमरे, गजानन आडे, रतन सपकाळ, रामप्रकाश व्यवहारे इत्यादींनी सहकार्य केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रमेश गंगावणे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रीडा अधिकारी आत्माराम बोथीकर यांच्या मार्गदर्शनाखाली नफीस पहेलवान, वासिम शेख, किसन पवार, अर्जून पवार, शाहरुख शेख यांनी परिश्रम घेतले.

******

 

No comments: