07 September, 2023

 

जिल्हयातील  शेतकरी उत्पादक कंपनी, बचतगट व शेतकऱ्यांनी

कृषि पायाभुत सुविधा निधी योजनेचा लाभ घ्यावा

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

* कृषि पायाभुत सविधा निधी योजनेच्या घडीपत्रिकेचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते विमोचन

 



 

            हिंगोली (जिमाका), दि. 07 :  जिल्हयातील  शेतकरी उत्पादक कंपनी , बचत गट व शेतकऱ्यांनी कृषि पायाभुत सुविधा निधी (AIF) योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना (PMFME) व आदर्श गांव या योजनांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शिवराज घोरपडे, स्मार्टचे जिल्हा नोडल अधिकारी जी. बी. बंटेवाड तसेच हिंगोली जिल्ह्यातील सर्व बँकेचे अधिकारी व कृषि विभागातील अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्री.पापळकर यांनी कृषि पायाभुत सुविधा निधी (AIF) योजनेचे उदिष्ट, पात्र लाभार्थी, योजनेतील घटक, पात्र प्रकल्प, काढणी पश्चात व्यवस्थापन प्रकल्प, सामुहिक शेती सुविधा, नव्याने पात्र प्रकल्पाचा समावेश, योजनेत सहभाग याविषयीचा आढावा घेतला.

या बैठकीत मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प अंतर्गत जिल्हा अंमलबजावणी कक्ष, स्मार्ट हिंगोली कार्यालयाकडून आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत कृषि पायाभुत सविधा निधी (AIF) योजनेच्या घडीपत्रिकेचे विमोचन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

*****

No comments: