09 February, 2018

जिल्ह्यात 10 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिनाचे आयोजन



वृत्त क्र.50                                                                            दिनांक : 9 फेब्रुवारी 2018
जिल्ह्यात 10 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिनाचे आयोजन
        हिंगोली दि.09: 1 ते 19 वर्ष वयोगटातील सर्व मुला मुलींना  शाळा व अंगणवाडी  केंद्र  स्तरावर जंतनाशक  गोळी देऊन त्यांचे आरोग्य  चांगले ठेवणे पोषण  स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे या उद्देशाने राष्ट्रीय जंतनाशक दिनाचे आयोजन करण्यात येते . याचे औचित्य साधून जिल्ह्यात  दिनांक 10 फेब्रुवारी रोजी जंतनाशक मोहीम  आरोग्य  विभाग , महिला व बाल कल्याण विभाग व  शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे .  या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील एकूण 3 लाख 61 हजार 148 मुला- मुलींना  जंतनाशक  गोळी देण्यात येणार आहे . जंतनाशकाची गोळी  सर्व  शासकीय अनुदानित , खाजगी शाळांमध्ये आणि अंगणवाडी  केंद्रामध्ये नि:शुल्क  मिळेल. या मोहिमेचे  उद्घाटन  मान्यवरांच्या हस्ते  जिल्हा परिषद कन्याशाळा येथे करण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी , जिल्हा परिषद यांनी कळविले आहे.
00000

07 February, 2018

रेशीम कायदा मसुदावर

सूचना सादर करण्याचे आवाहन


            हिंगोली,दि.07: महाराष्ट्र राज्यासाठी "The Maharashtra Silk Worm Seed, Cocoon And Silk Yarn (Regulation of Production, Supply Distribution And Sale) Act & Rules 2017" या नावाने रेशीम ॲक्टचा मसुदा शासनाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात येणार आहे. त्याबाबत जनतेच्या सूचना, हरकती, अभिप्राय तात्काळ उपलब्ध करुन देण्याबाबत सूचीत केले आहे. 
            रेशीम कायदा मसुद्याची मराठी व इंग्रजी प्रत जिल्हा रेशीम कार्यालय, हिंगोली यांच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या कायदाबाबत  सूचना, हरकती, अभिप्राय असल्यास नागरिकांनी लेखी स्वरुपात 20 फेब्रुवारी, 2018 पुर्वी जिल्हा रेशीम कार्यालय, हिंगोली येथे सादर करण्याचे आवाहन जिल्हा रेशीम कार्यालय, हिंगोली यांनी केले आहे.   

*****
बालकामगार मुलांचे सर्व्हेक्षण करण्यासाठी
इच्छूक संस्थेने प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

            हिंगोली, दि.7 :  बालकामगार ही एक सामाजीक अनिष्ठ प्रथा आहे. बालमजुरीमुळे बालकांच्या शारिरीक स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होतो. तसेच त्यांना शिक्षणापासुन कायमचे वंचित रहावे लागते. यामुळे अशा बालकांचे भविष्य अंध:कारमय होते. अकुशल कामाच्या पर्यायाने दारिद्र्याच्या विळख्यात अडकुन पडते. भविष्य घडविण्याच्या वयात कामात अडकल्याने शिक्षणाअभावी उज्वल भवितव्याच्या संधी त्यांना दुरापास्त होतात. हे टाळण्यासाठी हिंगोली जिल्ह्यात बालकामगार क्षेत्रात कार्य करण्याचा अनुभव असलेल्या अशा सेवाभावी संस्थेच्यवतीने बालकामगार मुलांचे सर्वेक्षण दि. 15 ते 25 फेब्रुवारी, 2018 या कालावधीत करण्याचे आयोजन केले आहे.
तरी इच्छुक सेवाभावी संस्थेने सरकारी कामगार अधिकारी कार्यालय डी.आर.टी.पलटण हिंगोली येथे संपर्क साधुन सर्वेक्षणासाठी लागणारे फॉर्मस व जिल्हाधिकारी, हिंगोली यांच्या सहीचे बालकामगार कामावर ठेवणार नाही असे हमी पत्र या कार्यालयातुन पुरवठा करण्यात येईल, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी टी. ई. कराड यांनी केले आहे.

***** 

06 February, 2018

समाजमाध्यमांच्या विधायक उपयोगाचा उपक्रम
‘सोशल मीडिया महामित्र’
सहभागी होण्याचे आवाहन
नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद
हिंगोली, दि. 6 : आधुनिक युगातील वेगवान संपर्क साधनांचा विधायक उपयोग करुन घेण्यासाठी आणि तरुणांना अधिकाधिक वाव देऊन समाज अधिक विवेकी व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या ‘सोशल मीडिया महामित्र’उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
देशातील बहुतांश तरुण फेसबुक, व्हॉट्सॲप, ट्विटर, इन्स्टाग्राम आदी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात उपयोग करीत असतात. ज्ञान आणि मनोरंजनाच्या साधनाबरोबरच लोकांची मने आणि मते घडविण्याची ताकद सोशल मीडियामध्ये असल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे. ही बाब समोर ठेऊन सोशल मीडियाचा सदुपयोग समाजात अधिक विवेकवादी आणि सकारात्मक दृष्टीकोन तयार व्हावा म्हणून करणाऱ्या तरुणांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ‘सोशल मीडिया महामित्र’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात ‘सोशल मीडिया महामित्र’ पुरस्कारप्राप्त व्यक्तींना मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीने डिजिटल प्रशस्तीपत्र दिले जाणार आहे. सोशल मीडिया क्षेत्रातील प्रभावी व्यक्तींना भेटण्याची, प्रत्यक्ष संवाद  साधण्याची, सेल्फी घेण्याची संधीदेखील  मिळणार आहे.
या उप्रकमासाठी 1 फेब्रुवारीपासून नोंदणी सुरु झाली असून ती 18 फेब्रुवारीपर्यंत सुरु राहणार आहे. ‘गुगल प्ले स्टोअर’ अथवा ॲपलच्या ‘’ॲप स्टोअर वरुन महामित्र (Maha Mitra) हे ॲप्लीकेशन डाऊनलोड करुन नोंदणी करता येणार आहे. या उपक्रमात राज्यातील 15 वर्षावरील कोणीही रहिवासी विनाशुल्क सहभागी होऊ शकेल.
प्रत्येक तालुक्यातून (क्षेत्रातून) प्रत्येकी 10 ‘सोशल मिडिया महामित्र’ निवडले जाणार असून त्यांना जिल्हास्तरावर विशेष कार्यक्रमासाठी आमंत्रित केले जाईल. या महामित्रांची जिल्हाधिकारी, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी,पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक यांच्या समवेत समाज माध्यमाच्या सदुपयोगाबाबत गटचर्चा आयोजित करण्यात येईल. या गटचर्चेअंती तालुक्यातील (क्षेत्रातील) प्रत्येकी 1 महामित्राची राज्यस्तरावर होणाऱ्या कार्यक्रमासाठी निवड करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या राज्य स्तरावरील कार्यक्रमात समाज माध्यम क्षेत्रात प्रभावी अशा विविध क्षेत्रातील प्रतिष्ठितांना आमंत्रित करण्यात येईल. या कार्यक्रमात निवडलेल्यांना ‘सोशल मिडिया महामित्र’ पुरस्कार देण्यात येईल तसेच त्यांना मान्यवरांशी संवाददेखील साधता येणार आहे.
विविध मॅसेजिंग ॲपच्या सर्वाधिक टॉप पाच ग्रुपमधील कॉन्टॅक्ट्सची संख्या, फोनबुकमधील एकूण कॉन्टॅक्ट्सची संख्या, किती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म/मॅसेजिंग ॲप्लीकेशन उपयोगात आणण्यात येत आहेत, सहभागी व्यक्तीला त्याच्या स्नेहीजनांनी दिलेली मते, सोशल मीडियातील प्रभाव आजमावण्यासाठी सहभागी व्यक्तीला पाठविलेल्या संदेशापैकी किती संदेश त्यांनी वितरित केले आहेत, आलेल्या संदेशाचे पाठविलेल्या संदेशाशी गुणोत्तर. या आधारे महामित्र निवडण्यात येतील. या निकषांना मिळणाऱ्या गुणांकन आधारे आपले स्थान (रँक) काय आहे हे त्या सहभागी व्यक्तीला दिसेल.  निकषात असलेल्या 75 गुणांच्या आधारे प्रत्येक तालुक्यातील (क्षेत्रातील) टॉप 20 सहभागी व्यक्तींची प्राथमिक फेरीत निवड करण्यात येईल. सहभागी व्यक्तीने या मोहिमेकरिता एक संदेश (मजकूर, ॲनिमेशन, ग्राफिक्स आदी) तयार करावा व तो ॲपमार्फत आयोजकांना पाठवावा. या संदेशाच्या आधारे 20 मधून 10 जणांची गट चर्चेसाठी  निवड करण्यात येईल. गटचर्चेतील सहभागाआधारे 15 पैकी गुण देऊन या 10 व्यक्तींपैकी एकाची राज्यस्तरावरील कार्यक्रमासाठी निवड करण्यात येणार आहे.
सकारात्मक व सौहार्दपूर्ण महाराष्ट्र बनविण्यात आपला हातभार लावण्यासाठी ‘सोशल मीडिया-महामित्र’ उपक्रमात राज्यातील तरुणांसह महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

*****

02 February, 2018

‘सोशल मीडिया महामित्र’ समाजमाध्यमांच्या विधायक उपयोगाचा उपक्रम



वृत्त क्र.49                                                                            दिनांक : 2 फेब्रुवारी 2018
      समाजमाध्यमांच्या विधायक उपयोगाचा उपक्रम
 सोशल मीडिया महामित्र
सहभागी होण्याचे आवाहन
नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद
 हिंगोली,दि. 2 : आधुनिक युगातील वेगवान संपर्क साधनांचा विधायक उपयोग करुन घेण्यासाठी आणि तरुणांना अधिकाधिक वाव देऊन समाज अधिक विवेकी व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या सोशल मीडिया महामित्रउपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
देशातील बहुतांश तरुण फेसबुक, व्हॉट्सॲप, ट्विटर, इन्स्टाग्राम आदी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात उपयोग करीत असतात. ज्ञान आणि मनोरंजनाच्या साधनाबरोबरच लोकांची मने आणि मते घडविण्याची ताकद सोशल मीडियामध्ये असल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे. ही बाब समोर ठेऊन सोशल मीडियाचा सदुपयोग समाजात अधिक विवेकवादी आणि सकारात्मक दृष्टीकोन तयार व्हावा म्हणून करणाऱ्या तरुणांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सोशल मीडिया महामित्रहा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात सोशल मीडिया महामित्रपुरस्कारप्राप्त व्यक्तींना मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीने डिजिटल प्रशस्तीपत्र दिले जाणार आहे. सोशल मीडिया क्षेत्रातील प्रभावी व्यक्तींना भेटण्याची, प्रत्यक्ष संवाद  साधण्याची, सेल्फी घेण्याची संधीदेखील  मिळणार आहे.
या उप्रकमासाठी आज 1 फेब्रुवारीपासून नोंदणी सुरु झाली असून ती 18 फेब्रुवारीपर्यंत सुरु राहणार आहे. गुगल प्ले स्टोअरअथवा ॲपलच्या ‘’ॲप स्टोअर वरुन महामित्र (Maha Mitra) हे ॲप्लीकेशन डाऊनलोड करुन नोंदणी करता येणार आहे. या उपक्रमात राज्यातील 15 वर्षावरील कोणीही रहिवासी विनाशुल्क सहभागी होऊ शकेल.
प्रत्येक तालुक्यातून (क्षेत्रातून) प्रत्येकी 10सोशल मिडिया महामित्रनिवडले जाणार असून त्यांना जिल्हास्तरावर विशेष कार्यक्रमासाठी आमंत्रित केले जाईल. या महामित्रांची जिल्हाधिकारी, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक यांच्या समवेत समाज माध्यमाच्या सदुपयोगाबाबत गटचर्चा आयोजित करण्यात येईल. या गटचर्चेअंती तालुक्यातील (क्षेत्रातील) प्रत्येकी 1 महामित्राची राज्यस्तरावर होणाऱ्या कार्यक्रमासाठी निवड करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या राज्य स्तरावरील कार्यक्रमात समाज माध्यम क्षेत्रात प्रभावी अशा विविध क्षेत्रातील प्रतिष्ठितांना आमंत्रित करण्यात येईल. या कार्यक्रमात निवडलेल्यांना सोशल मिडिया महामित्रपुरस्कार देण्यात येईल तसेच त्यांना मान्यवरांशी संवाददेखील साधता येणार आहे.
विविध मॅसेजिंग ॲपच्या सर्वाधिक टॉप पाच ग्रुपमधील कॉन्टॅक्ट्सची संख्या, फोनबुकमधील एकूण कॉन्टॅक्ट्सची संख्या, किती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म/मॅसेजिंग ॲप्लीकेशन उपयोगात आणण्यात येत आहेत, सहभागी व्यक्तीला त्याच्या स्नेहीजनांनी दिलेली मते, सोशल मीडियातील प्रभाव आजमावण्यासाठी सहभागी व्यक्तीला पाठविलेल्या संदेशापैकी किती संदेश त्यांनी वितरित केले आहेत, आलेल्या संदेशाचे पाठविलेल्या संदेशाशी गुणोत्तर. या आधारे महामित्र निवडण्यात येतील. या निकषांना मिळणाऱ्या गुणांकन आधारे आपले स्थान (रँक) काय आहे हे त्या सहभागी व्यक्तीला दिसेल.  निकषात असलेल्या 75 गुणांच्या आधारे प्रत्येक तालुक्यातील (क्षेत्रातील) टॉप 20 सहभागी व्यक्तींची प्राथमिक फेरीत निवड करण्यात येईल. सहभागी व्यक्तीने या मोहिमेकरिता एक संदेश (मजकूर, ॲनिमेशन, ग्राफिक्स आदी) तयार करावा व तो ॲपमार्फत आयोजकांना पाठवावा. या संदेशाच्या आधारे 20 मधून 10 जणांची गट चर्चेसाठी  निवड करण्यात येईल. गटचर्चेतील सहभागाआधारे 15 पैकी गुण देऊन या 10 व्यक्तींपैकी एकाची राज्यस्तरावरील कार्यक्रमासाठी निवड करण्यात येणार आहे.
सकारात्मक व सौहार्दपूर्ण महाराष्ट्र बनविण्यात आपला हातभार लावण्यासाठी सोशल मीडिया-महामित्रउपक्रमात राज्यातील तरुणांसह महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
0000

सन 2018 साठीच्या स्थानिक सुट्या जाहिर



वृत्त क्र.48                                                                            दिनांक : 2 फेब्रुवारी 2018

सन 2018 साठीच्या स्थानिक सुट्या जाहिर

        हिंगोली दि.02: परिक्रम्य संलेख अधिनियम 1881 अंतर्गत राज्य शासनाने  संदर्भिय  शासन  निर्णयाद्वारे प्राप्त झालेल्या अधिकारानुसार जिल्हाधिकारी श्री. अनिल भंडारी यांनी सन-2018 या वर्षाकरीता हिंगोली जिल्ह्यासाठी पुढीलप्रमाणे स्थानिक सुट्टी जाहीर केल्या आहेत.
            दिनांक 17 फेब्रुवारी 2018 रोजी ( शनिवार) रथोत्सव यात्रा औंढा ना.,  दिनांक 25 एप्रिल 2018 (बुधवार) रोजी हजरत सिरेहक शाहबाबा उर्दू तीथी रहेमत तुल्ला का संदल उरुस (चिराग शहावली), आणि दिनांक 10 ऑक्टोबर 2018(बुधवार) रोजी घटस्थापनेनिमित्त स्थानिक सुट्या (राज्य न्यायालयाच्या अधिकार कक्षेतील कार्यालय, केंद्रीय प्रशासनातील कार्यालये व बँकेच्या कक्षेतील कार्यालयाखेरीज) हिंगोली जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये, जिल्हा परिषदेच्या कक्षेतील कार्यालय, स्थानिक स्वराज्य संस्थेची कार्यालये, जिल्ह्यातील शासकीय कोषागारे, महामंडळाची कार्यालये व इतर सर्व  खाजगी शैक्षणिक संस्था यांना लागू राहतील, असे जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी कळविले आहे.
00000


महिला उद्योजक पुरस्काराकरीता अर्ज करण्याचे आवाहन



वृत्त क्र.47                                                                            दिनांक : 2 फेब्रुवारी 2018
महिला उद्योजक पुरस्काराकरीता अर्ज करण्याचे आवाहन

        हिंगोली दि.02: राज्यातील महिला उद्योजकांसाठी विशेष धोरण-2017 दि. 14 डिसेंबर, 2017 रोजी राज्य शासनातर्फे जाहीर करण्यात आले आहे. सदर धोरणानुसार सुक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिला उद्योजकांना प्रशस्तीपत्र देवुन शासनाने गौरवण्याचे योजिले आहे.  त्या अनुषंगाने फेब्रुवारी 2018 मध्ये मुंबई येथे आयोजित मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स-2018 समारंभात पुरस्कार स्वरुपात सन्मानपत्र दयावयाचे आहेत. खालील पात्रता व निकष पूर्ण करणा-या महिला उद्योजकांकडून अर्ज प्राप्त करावयाचे आहेत.एकल मालकी घटक-महिला उद्योजकांचे 100 टक्के भाग भांडवल,भागीदारी घटक-भागीदारी घटक ज्यामध्ये 100 टक्के भाग भांडवल,सहकारी क्षेत्र-सहकारी कायद्यांतर्गत ज्या सहकारी संस्थेमध्ये 100 टक्के महिला उद्योजकांचा समावेश असलेली संस्था,खाजगी किंवा सार्वजनिक मर्यादित घटक-ज्या घटकामध्ये महिला उद्योजकांचे किमान 100 टक्के भाग भांडवल असेल अशी कंपनी,स्वयं सहाय्यता बचत गट-जो बचत गट नोंदणीकृत असून, सदर व्याख्येतील क्रमांक 3 आणि 4 नुसार स्थापित झालेले आहे. ( उद्योगांच्या उपरोक्त नमुद केलेल्या घटकांमध्ये किमान 50 टक्के महिला कामगार असलेल्या उपक्रमांना योजने अंतर्गत प्रोत्साहनासाठी पात्र समजण्यात येईल.)
`       या पुरस्काराकरीता पुढीलप्रमाणे  निकष असणार असून पुरस्कारार्थी महिला उद्योजिका ही दि. 14 डिसेंबर, 2017 च्या शासन निर्णयामध्ये विहीत करण्यात आलेल्या महिला उद्योजकांच्या व्याख्येमध्ये बसणारी असावी. उद्योग घटक गेल्या 3 वर्षात सतत उत्पादनात असावा, सदरच्या महिला उद्योग घटकास राज्य शासनाच्या उद्योग विभागामार्फत यापूर्वी कुठलाही पुरस्कार मिळालेला नसावा,उद्योग घटकांची निवड करताना विविध मुदयांचा समावेश करण्यात येईल जसे गेल्या 3 वर्षात घटकाचे उत्पादन, रोजगार निर्मिती, गुंतवणुक व नफा याद्वारे दिलेल्या वाढीचा दर, तंत्रज्ञानाची निवड व वापर (स्वत: विकसीत केलेले/स्वदेशी/परदेशी), उद्योजकेची पार्श्वभुमी, प्रथम पिढीची उद्योजिका आहे किंवा कसे ? उद्योग उभारणीत स्वावलंबित्व उद्योगाच्या स्थानाची निवड, उत्पादनाचा विकास (संशोधन व विकासासाठीचे प्रयत्न, गुणवत्ता नियंत्रणासाठीची उपाय इ.), आयात  पर्यायी उत्पादन व निर्यात, डायर्व्हसिफीकेशन व बाजारपेठेत नव्या उत्पादनाचा यशस्वीपणे समावेश, उद्योगाचे व्यवस्थापन यामध्ये इन्व्हेंटरी कंट्रोल, लेखे, मार्केटिंग बाबत, कामगार कल्याण, उद्योजिका अनु.जाती/अनु.जमातीची असल्यास अधिकचे गुण इ.निकषांचा विचार करुन पुरस्कार देण्यात येतील. विहित पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या इच्छुक महिला उद्योजकांनी दि. 05  फेब्रूवारी, 2018 पूर्वी विहित नमुन्यातील अर्ज सर्व कागदपत्रांसह महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र, मध्यवर्ती प्रशासकिय इमारत, एस-12 हिंगोली  (दु.क्र. 02456- 222218 E-mail- didichingoli@maharashtra.gov.in) येथे सादर करावेत, असे आवाहन महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र , हिंगोली यांनी केले आहे.
00000