हिंगोली (जिमाका), दि. 12 : जिल्ह्यातील पाणी टंचाई परिस्थितीच्या अनुषंगाने विविध गावांमध्ये नवीन विंधन विहिरी व हातपंप उभारणीच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी वसमत, सेनगाव व हिंगोली तालुक्यातील प्रस्तावित कामांची अंदाजपत्रके जिल्हाधिकारी कार्यालयास सादर केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी संबंधित कामांना अटी व शर्तीच्या अधीन राहून मान्यता दिली आहे.
वसमत व सेनगाव तालुक्यातील पाणीटंचाई आराखड्यात समाविष्ट तसेच प्रपत्र ‘ब’ प्राप्त झालेल्या 16 गावांमध्ये 23 नवीन विंधन विहिरींच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये वसमत तालुक्यातील आंबा, पळशी, वाखारी, पळसगाव ता. माळवटा, सारोळा तसेच सेनगाव तालुक्यातील रामप्रसाद नगर, भंडारी, हत्ता तांडा, हत्ता, गोंडाळा, गोरेगाव, कहाकर बु., आजेगाव, सवना, कडोळी व उटीब्रम्हचारी या गावांचा समावेश आहे. प्रति विंधन विहिरीस 78 हजार 51 रुपये याप्रमाणे एकूण 17 लाख 95 हजार 173 रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
तसेच हिंगोली तालुक्यातील पारोळा, समगा, घोटादेवी, बोराळा, बोराळवाडी, दुर्गधामणी व भांडेगाव या 7 गावांमध्ये 7 नवीन विंधन विहिरी व हातपंपाच्या कामांसाठी प्रति विंधन विहिरी 78 हजार 51 रुपये याप्रमाणे एकूण 5 लाख 46 हजार 357 रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली आहे.
याशिवाय हिंगोली तालुक्यातील खडकद बु., खानापूर बंगला, खंडाळा, देऊळगाव रामा व गाडीबोरी या 5 गावांमध्ये 6 नवीन विंधन विहिरी व हातपंपाच्या कामांचे सविस्तर अंदाजपत्रक शासन मान्य दराप्रमाणे तयार करण्यात आले असून, त्यासाठी 4 लाख 68 हजार 306 रुपयांच्या खर्चासही जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी अटी व शर्तीच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे.
*******
No comments:
Post a Comment