हिंगोली(जिमाका),
दि. 15 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता
(महाटीईटी) 2026 परीक्षेचे रविवार दि. 21 जून रोजी आयोजन करण्यात आले होते. मात्र 21
जून रोजी नीट (NEET) या परीक्षेचे आयोजन एनटीएमार्फत संपूर्ण देशभरात विविध केंद्रावर
करण्यात आलेले असून दोन्ही परीक्षांची बहुतांशी केंद्र एकच येत असल्याने परीक्षा सुरळीतपणे
पार पाडण्यासाठी व परीक्षार्थी हित लक्षात घेता महाराष्ट्र शिक्षक पात्रता 2026 परीक्षेचे
आयोजन 21 जून ऐवजी रविवार दि. 28 जून रोजी
करण्यात आले आहे.
प्रवेशपत्राची
ऑनलाइन प्रिंट 16 ते 28 जून या सुधारित कालावधीत काढता येणार आहे. तर शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर क्रमांक एक दि.
28 जून रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 1 या वेळेत होईल. तर शिक्षक पात्रता परीक्षेचा दुसरा
पेपर त्याच दिवशी अर्थात 28 जून रोजी दुपारी 2.30 पासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत असेल.
अद्ययावत माहिती परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल
याची परीक्षार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
******
No comments:
Post a Comment