हिंगोली (जिमाका),
दि. 15 : तहसील कार्यालय औंढा नागनाथ येथे महसूल विभागांतर्गत “छत्रपती शिवाजी महाराज
महसूल समाधान शिबिर” टप्पा-1 अंतर्गत आज शुक्रवारी समाधान शिबिराचे आयोजन करण्यात
आले. शिबिरास नगराध्यक्ष कपील खंदारे, विभागीय
आयुक्त कार्यालयातील उपायुक्त रमेश काटकर उपस्थित होते.
उपविभागीय अधिकारी
विकास माने यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित शिबिरात तहसीलदार हरीश गाडे व नायब तहसीलदार
अनिता कोलगणे उपस्थित होते.
या समाधान शिबिरामध्ये
औंढा नागनाथ मंडळातील नागरिकांना मंडळ व तहसील स्तरावर विविध शासकीय सेवा प्रत्यक्ष
उपलब्ध करून देण्यात आल्या. यामध्ये शिधापत्रिका वाटप, उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र
वितरण, सातबारा नोंदी, सातबारा वरील शिवरस्ते नोंदी आदी महसुली कामांचा समावेश होता.
तसेच संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, आरोग्य विभाग, कृषी विभाग, पंचायत
समिती विभाग आणि इतर विविध शासकीय योजनांची माहिती व लाभ नागरिकांना देण्यात आले.
यावेळी उपायुक्त रमेश
काटकर, उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार हरीश गाडे आणि नायब तहसीलदार अनिता
कोलगणे यांनी उपस्थित नागरिकांना विविध शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास पुरवठा
निरीक्षक कल्याणी हटवार, कृषी अधिकारी शिवप्रसाद संगेकर, मंडळ अधिकारी आशा गिते, तलाठी
गजानन गुंजकर, विशाखा डोंगरे, जी. एस. मुकीर, भुसावळे, गजानन हजारे, रुपा कळसकर, केशव
जगताप, इमरान पठाण, अक्षय कांबळे, वहीद पठाण, नितेश कुलकर्णी यांच्यासह मोठ्या संख्येने
नागरिक उपस्थित होते.
******

No comments:
Post a Comment