* शेतकऱ्यांनी लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन
हिंगोली(जिमाका), दि. ८ : राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया, राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान तसेच कडधान्य आत्मनिर्भरता अभियान सन २०२६-२७ अंतर्गत खरीप हंगामामध्ये गळीतधान्य, अन्नधान्य, तृणधान्य, भरडधान्य व कडधान्य पिकांचे क्षेत्र व उत्पादन वाढविण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत शेतकऱ्यांना सुधारित वाणांचे दर्जेदार बियाणे वेळेवर उपलब्ध करून देण्यासाठी प्रमाणित बियाणे वितरण व पिक प्रात्यक्षिके हे घटक महाडीबीटी प्रणालीद्वारे राबविण्यात येत आहेत.
सन २०२६-२७ खरीप हंगामासाठी तुर, मूग, उडीद, मका, ज्वारी व सोयाबीन या पिकांसाठी प्रमाणित बियाणे वितरण (१० वर्षाखालील व १० वर्षावरील वाण) तसेच पिक प्रात्यक्षिके या घटकांसाठी महाडीबीटी प्रणालीवर ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
तरी जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर तात्काळ ऑनलाइन अर्ज करावेत. उपलब्ध निधीचा लाभ घेऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी महाडीबीटी प्रणालीवर अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे यांनी केले आहे.
*******
No comments:
Post a Comment