02 May, 2026

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची औंढा नागनाथ येथे विकास कामांची पाहणी; हिंगोलीत वैद्यकीय महाविद्यालयाचा आढावा व आर्ट ऑफ लिव्हिंग कार्यक्रमाचे उद्घाटन

 


हिंगोली (जिमाका), दि. 02 : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज औंढा नागनाथ येथे भेट देऊन विविध विकास कामांची पाहणी केली. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कामांचा आढावा घेत त्यांनी आवश्यक त्या सूचना दिल्या. यानंतर त्यांनी औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. यावेळी तहसीलदार हरीश गाडे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

त्यानंतर जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी हिंगोली येथे सुरू असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीची पाहणी करून आराखड्याची सविस्तर माहिती घेतली. कामाची प्रगती, दर्जा आणि नियोजनाबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आरोग्य सेवांबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या. या बैठकीस वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्यासह संबंधित वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

याच दिवशी हिंगोली येथील शिवाजीराव देशमुख सभागृहात आयोजित ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ कार्यक्रमास जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी उपस्थित राहून उद्घाटन केले. कार्यक्रमाच्या माध्यमातून मानसिक आरोग्य, तणावमुक्त जीवनशैली व सकारात्मक दृष्टिकोन यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

*******


No comments: