हिंगोली (जिमाका), दि. 21 : जिल्ह्यातील
पाणी टंचाई परिस्थितीच्या अनुषंगाने विविध गावांमध्ये नवीन विंधन विहिरी व हातपंप उभारणीच्या
कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
यांनी वसमत तालुक्यातील प्रस्तावित कामांची अंदाजपत्रके जिल्हाधिकारी कार्यालयास सादर
केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी संबंधित कामांना अटी व शर्तीच्या
अधीन राहून मान्यता दिली आहे.
वसमत तालुक्यातील पाणीटंचाई आराखड्यात
समाविष्ट तसेच प्रपत्र ‘ब’ प्राप्त झालेल्या 4 गावांमध्ये 5 नवीन विंधन विहिरींच्या
कामांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये वसमत तालुक्यातील जवळा बु., लहाण, हिवरा खु.
व आरळ या गावांचा समावेश आहे. प्रति विंधन विहिरीस 78 हजार 51 रुपये याप्रमाणे एकूण
3 लाख 90 हजार 255 रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
******
No comments:
Post a Comment