जिल्हयात
कलम 37 (1) (3) चे आदेश लागू
हिंगोली,
दि. 09 :
जिल्ह्यात येणाऱ्या कालावधीत दिनांक 18 मार्च रोजी गुडीपाडवा
सण साजरा करण्यात येणार आहे. सध्या
विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु
असून 10 वी व 12 वी परीक्षा सुरु आहेत.
तसेच शिक्षकांचे आंदोलन , मराठा
आरक्षण, भारीप बहुजन महासंघ
यांना मा . न्यायालयाचे आदेशाने
आंदोलनात जाळपोळीची नुकसान भरपाई
करणे संबंधी नोटीस
पाठविण्यात आल्याने त्याचे
प्रतिक्रिया उमटत आहे तसेच
त्रिपुरामध्ये अज्ञात लोकांनी लेनीन
यांचा पुतळा पाडल्यामुळे विविध
जातीय संघटनांमध्ये प्रतिक्रीया
उमटत त्यामुळे सध्या
असंतोषाचे वातावरण आहे .
शेतकऱ्यांची
कर्जमाफी, शेतकऱ्यांच्या मालाला भाव , शेतकऱ्यांना
वीज जोडणी , लोडशेडींग अशा वेगवेगळ्या
प्रश्नांमुळे मोर्चे, धरणे, आंदोलने, रास्ता रोको अशा विविध प्रश्न हाताळण्यासाठी व कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्याकरिता संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात दिनांक 9
मार्च रोजीचे 06.00 वाजल्यापासून ते दिनांक 23 मार्च 2018 रोजीचे 24.00 वाजेपावेतो मुंबई पोलीस
अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) चे आदेश लागू करण्यात येत असल्याचे अतिरिक्त
जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.
त्यानुसार
शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्या व्यतिरिक्त कोणतीही व्यक्ती सार्वजनिक
ठिकाणी त्यांच्या जवळ शस्त्र, काठी, तलवार, बंदुका बाळगणार नाहीत. लाठ्या किंवा
काठ्या, शारीरिक इजा होण्यास त्या कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील अशा वस्तु
जवळ बाळगणार नाहीत. कोणतेही क्षारक पदार्थ, स्फोटक द्रव्ये जवळ बाळगणार नाहीत.
दगड, क्षेपणीक उपकरणे, किंवा सर्व प्रवर्तक द्रव्य गोळा करून ठेवणार नाही, किंवा
जवळ बाळगणार नाहीत. आवेशी भांडणे अंगविक्षेप, विटंबनात्मक नकला करणार नाही.
सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किंवा अराजक माजेल अशी चिन्हे निशाणी, घोषणा फलक
किंवा अशी कोणतीही वस्तु जवळ बाळगणार नाही किंवा ठेवणार नाहीत. व्यक्ती किंवा
समुहाच्या भावना जाणुन बुजुन दुखावतील याउद्देशाने वाद्य वाजणार नाहीत किंवा असभ्य
वर्तन करणार नाहीत. पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमूद असलेली
कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास जमण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा
आदेश पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम,
यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू
होणार नाही असे जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले
आहे.
000000


