21 February, 2018

जिल्हयात कलम 37 (1) (3) चे आदेश लागू



जिल्हयात कलम 37 (1) (3) चे आदेश लागू
हिंगोली, दि. 21 :  जिल्ह्यात येणाऱ्या कालावधीत दिनांक 1 मार्च रोजी होळी , 2 मार्च रोजी  धुळीवंदन  आणि 3 मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज  जयंती(तिथीप्रमाणे)  असे सण साजरे  होणार आहेत.  तसेच गारपीटीने  झालेले नुकसान  भरपाई , राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत  यांच्या वादग्रस्त विधानावरुन  राजकीय वर्तुळातील प्रतिक्रीया आगामी उन्हाळी अधिवेशन अशा विविध घटनांमुळे   कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण  होण्याची शक्यता  नाकारता येत नाही . तसेच रामलीला मैदान हिंगोली  येथील फेरीवाल्यांच्या प्रश्नांवरुन असंतोषाचे  वातावरण  आहे , शेतकऱ्यांच्या मालाला भाव , शेतकऱ्यांना  वीज जोडणी , लोडशेडींग अशा वेगवेगळ्या  प्रश्नांमुळे मोर्चे, धरणे, आंदोलने, रास्ता रोको अशा विविध  प्रश्न हाताळण्यासाठी  व कायदा व सुव्यवस्था आबाधित  राखण्याकरिता  संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात दिनांक 20 फेब्रुवारी 2018 रोजीचे 06.00 वाजल्यापासून ते दिनांक 7 मार्च 2018 रोजीचे  24.00 वाजेपावेतो मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) चे आदेश लागू करण्यात येत असल्याचे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.
त्यानुसार शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्या व्यतिरिक्त कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या जवळ शस्त्र, काठी, तलवार, बंदुका बाळगणार नाहीत. लाठ्या किंवा काठ्या, शारीरिक इजा होण्यास त्या कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील अशा वस्तु जवळ बाळगणार नाहीत. कोणतेही क्षारक पदार्थ, स्फोटक द्रव्ये जवळ बाळगणार नाहीत. दगड, क्षेपणीक उपकरणे, किंवा सर्व प्रवर्तक द्रव्य गोळा करून ठेवणार नाही, किंवा जवळ बाळगणार नाहीत. आवेशी भांडणे अंगविक्षेप, विटंबनात्मक नकला करणार नाही. सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किंवा अराजक माजेल अशी चिन्हे निशाणी, घोषणा फलक किंवा अशी कोणतीही वस्तु जवळ बाळगणार नाही किंवा ठेवणार नाहीत. व्यक्ती किंवा समुहाच्या भावना जाणुन बुजुन दुखावतील याउद्देशाने वाद्य वाजणार नाहीत किंवा असभ्य वर्तन करणार नाहीत. पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमूद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास जमण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.
000000
      

20 February, 2018

जिल्ह्यात कलम 144 लागू



जिल्ह्यात कलम 144 लागू
        हिंगोली, दि.20:-  जिल्ह्यात  उच्च माध्यमिक (इयत्ता 12 वी ) आणि माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी) परीक्षा दिनांक 21 फेब्रुवारी पासून 24 मार्च 2018 पर्यंत घेण्यात येणार आहेत .  या कालावधीत  जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती  हाताळण्यासाठी  इयत्ता 10 वीच्या परीक्षेसाठीचे 51 केंद्र आणि इयत्ता 12 वीच्या  परीक्षेसाठीचे 31 केंद्र परीसरात  फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम  144 लागू  करण्यात आले आहे.
                या परीक्षा उपकेंद्राच्या इमारती व परीसर  यामध्ये परीक्षेच्या शांतता पूर्ण  आयोजनासाठी  प्राधिकृत व्यक्तीशिवाय इतर कोणत्याही  व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही ,  परीक्षा उपकेंद्राच्या 100 मीटर  परिसरात  फोन , झेरॉक्स मशीन , टेलिफोन बुथ चालू ठेवण्यास मनाई करण्यात येत आहे ,  हा आदेश  नियुक्त केलेले अधिकारी / कर्मचारी  तसेच परीक्षेसाठी  येणारे विद्यार्थी  यांना परीक्षा केंद्रात प्रवेशासाठी  लागू राहणार नाही ,  हा आदेश शासकीय  कर्तव्यावरील  अधिकारी / कर्मचारी आणि पोलीस अधीक्षक , हिंगोली यांनी बंदोबस्त  कामी नेमणुक  केलेल्या पोलीस कर्मचारी यांना परवानगी दिलेली आहे , अशा व्यक्तींना लागू राहणार नाही , परीक्षार्थी यांना परीक्षा केंद्रात  डिजिटल  डायरी, मायक्रोफोन , मोबाईल , पेजर ,गणकयंत्र इत्यादी घेऊन जाण्यावर बंदी असेल , असे  जिल्हादंडाधिकारी , हिंगोली यांनी कळविले आहे
00000
      

17 February, 2018


गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करणार
                                     -- पालकमंत्री दिलीप कांबळे

हिंगोली, दि. 17 : गारपीटग्रस्त शेती पिकांचे पंचनामे पुर्ण झाले असून गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचे जे काही नुकसान झाले आहे. त्याची निश्चितपणे नुकसान भरपाई लवकरच देण्यात येईल अशी ग्वाही पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी दिली.
कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा कृषी महोत्सवाच्या प्रसंगी पालकमंत्री बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवरानीताई नरवाडे, सर्वश्री आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार संतोष टारफे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, प्र. जिल्हाधिकारी जगदिश मिनीयार, मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड, निवासी उपजिल्हाधिकारी लतीफ पठाण, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री श्री. कांबळे पुढे म्हणाले की, जिल्हा कृषी महोत्सव हे पुढील पाच दिवस चालणार असून शेतकऱ्यांना विविध स्टॉलच्या माध्यमातून उत्पन्न वाढण्याविषयी मार्गदर्शन मिळणार आहे. कृषी विभागाने या प्रदर्शनाच्या माध्यमातूनच नाही तर मोठमोठ्या शहरामध्ये सुध्दा शेतकऱ्यांच्या मालाची व भाजीपाल्याची विक्री करणार आहे. तसेच विधीमंडळाच्या सभागृहाच्या बाहेरसुध्दा आठवडी बाजार सुरू केलेले आहे. दुष्काळामध्ये सुध्दा शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून दोन रुपये किलो दराने गहु व तीन रुपये किलो दराने तांदुळ अन्न सुरक्षा योजनेतून शेतकऱ्यांना दिले.
दुष्काळावर मात करण्यासाठी राज्यभर जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून बंधाऱ्याच्या कामाच्या खोलीकरणातून पावसाचे पाणी अडवून शेतकऱ्यांच्या विहिरीला मुबलक प्रमाणात पाण्याची उपलब्धता झाली आहे. शेतकऱ्यांनी शेतीवरच अवलंबून न राहता पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाच्या  योजनेच्या माध्यमातून जोडधंदा करून उत्पन्न घ्यावे. शेतकरी कर्जमाफी योजनेत 40 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली आहे. उर्वरित शेतकऱ्यांना ही दोन चार दिवसात कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.
पावसाचे पाणी अडवून नदी व विहिरीची पाणी पातळी वाढली असून सुक्ष्म सिंचनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी पाण्याच्या अवलंबतेवर पिकाचे नियोजन करून ठिबक सिंचनाव्दारे शेती करावी असे आवाहन पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी केले. जिल्हा कृषी महोत्सवात महिलांनी सुध्दा सक्रीय सहभाग नोंदवला असून बचत गटाच्या माध्यमातून आपल्या कुटूंबाला सावरण्याच काम त्या करीत आहेत. बचत गटाला अतिशय अल्प दराने कर्ज उपलब्ध करुन देण्याचे निर्देश बँकांना दिले आहे. तसेच सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून बचत गटाला 100 टक्के अनुदानावर मागासवर्गीयांना ट्रॅक्टर मोफत देणार असल्याचे यावेळी पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी सांगितले.
प्रारंभी कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेली कृषी दिंडीला पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी उपस्थिती लावली तसेच जिल्हा कृषी महोत्सवात उभारण्यात आलेल्या स्टॉलची पाहणी केली.



यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार संतोष टारफे, प्र. जिल्हाधिकारी जगदिश मिनियार, मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड यांची समयोचित भाषणे झाली.
येथील देवडा अंध विद्यालयाच्या अंध विद्यार्थीनींनी स्वागतपर गीत गायले. याप्रसंगी पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्याहस्तेअंध विद्यार्थीनीना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच पांगरा शिंदे येथील प्रगतशील शेतकरी नारायण शिंदे व तोंडापूर कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ पी. पी. शेळके यांनी कयाधू यंग 49 या नवीन वाणाचे संशोधन लावला असून जिल्हा कृषी महोत्सवात सदरील वाण उपलब्ध आहे. शेतीविषयक तंत्रज्ञानाची शेतकऱ्यांना माहिती व्हावी या उद्देशाने रिलायन्स कंपनीचे एम किसान सॉफ्टवेअरचे उदघाटन पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते झाले या सॉफ्टवेअरमधून शेतकऱ्यांना शेतीविषयक तंत्रज्ञानाची ऑडिओ क्लिप व एसएमएस ची माहिती मिळणार आहे.
सदर कृषी महोत्सवाचे प्रास्ताविक आत्माचे प्रकल्प संचालक मिलिंद जाधव यांनी केले. यावेळी जिल्ह्यातील मोठ्या संख्येने लोकप्रतिनिधी, शेतकरी, महिला बचत गटाच्या महिला, पत्रकार, अधिकारी / कर्मचारी व स्टॉल विक्रेत्याची उपस्थिती होती.
जिल्हा कृषी महोत्सवाचे प्रदर्शन दि. 21 फेब्रुवारी, 2018 पर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे याचा लाभ शेतकरी व नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.    
*****



पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी
गारपीट व अवेळी पावसाने झालेल्या शेती पिकाची केली पाहणी     
                              
हिंगोली, दि. 17 : जिल्ह्यात गारपीट व अवेळी झालेल्या शेती पिकाची पाहणी पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी हिंगोली तालुक्यातील मौजे आडगांव, भिंगी व लिंबाळा येथील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन गहु, हरभरा व हळद पिकाची पाहणी केली.
यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, प्र. जिल्हाधिकारी जगदिश मिनियार, उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे, तहसिलदार गजानन शिंदे, व गावातील नागरिक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी गारपीटग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधुन त्यांना धीर दिला. गारपिटीमुळे नुकसान झालेल्या पिकांचा मोबदला शासनाच्या निकषानुसार तातडीने दिला जाईल असा दिलासाही यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना दिला.
*****


16 February, 2018

राज्यमंत्री मा.ना. श्री. मधुकरराव कांबळे यांचा जिल्हा दौरा



राज्यमंत्री मा.ना. श्री. मधुकरराव कांबळे यांचा जिल्हा दौरा
        हिंगोली, दि.16:- राज्यमंत्री (द.) उपाध्यक्ष तथा सदस्य सचिव साहित्यरत्न लोकशाहीर  अण्णा भाऊ  साठे स्मारक समिती  मा. ना.श्री. मधुकरराव कांबळे हे हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे .  दिनांक 18 फेब्रुवारी रोजी  सकाळी 11.00 वाजता  शासकीय विश्रामगृह  हिंगोली येथे आगमन (वेळ –राखीव ) , सकाळी 11.30 वाजता  शासकीय विश्रामगृह हिंगोली येथून शासकीय वाहनाने नांदेडकडे प्रयाण.

पालकमंत्री मा.ना. श्री. दिलीप कांबळे यांचा जिल्हा दौरा



पालकमंत्री मा.ना. श्री. दिलीप कांबळे यांचा जिल्हा दौरा
        हिंगोली, दि.16:- राज्यमंत्री, सामाजिक न्याय आणि  विशेष सहाय, मदत व पुनर्वसन, भुकंप पुनर्वसन, अल्पसंख्यांक विकास व वक्फ तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री. दिलीप कांबळे हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे . दिनांक 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.00 वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे आगमन व राखीव ,  सकाळी 11.30 वाजता  हिंगोली जिल्हा कृषी  महोत्सव व कयाधू बचत गटांच्या जिल्हास्तरीय  प्रदर्शन व विक्री केंद्राचे उद्घाटन समारंभास उपस्थिती (स्थळ: श्री. रामलिला मैदान , हिंगोली) ,  दुपारी 12.00 वाजता  हिंगोली येथून  शासकीय वाहनाने भिंगी ता. हिंगोलीकडे  प्रयाण, दुपारी 12.45 वाजता भिंगी येथे आगमन तसेच  अवेळी पाऊस  व गारपीटीमुळे झालेल्या  पिकांच्या नुकसानीची पाहणी ,  दुपारी 01.45 वाजता  भिंगी येथून वाहनाने लिंबाळा  ता. हिंगोलीकडे प्रयाण ,  दुपारी 2.00 वाजता  लिंबाळा  ता. हिंगोली येथे आगमन तसेच अवेळी  पाऊस  व गारपिटीमुळे  पिकांच्या झालेल्या  नुकसानीची पाहणी ,  दुपारी 3.30 वाजता  लिंबाळा  ता. हिंगोली  येथून वाहनाने हिंगोलीकडे  प्रयाण , दुपारी 4.15 वाजता  हिंगोली येथे आगमन व राखीव , सायं.4.30 वाजता पत्रकार परिषद (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय , हिंगोली) सायं. 6.00 वाजता शासकीय विश्रामगृह  हिंगोली येथून वाहनाने जिंतूर –जालना मार्गे औरंगाबाद कडे प्रयाण.
00000