कामाच्या
ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ अधिनियमाची
प्रभावी
अंमलबजावणीसाठी 10 डिसेंबर रोजी प्रशिक्षण सत्राचे आयोजन
हिंगोली (जिमाका), दि. 08 : कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व वितरण)
अधिनियम 2013 ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी या कायद्यातील तरतुदीबाबत
प्रसिध्दी, जागरुकता आणि संवेदनशीलता वाढविण्यासाठी जिल्ह्यातील ज्या कार्यालयात
10 किंवा दहापेक्षा अधिक अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत अशा शासकीय व खाजगी
आस्थापनांचे प्रमुख व प्रत्येक कार्यालयातील अंतर्गत तक्रार निवारण समिती
अध्यक्षासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय
इमारत, दुसरा मजला, कक्ष क्र. एस-7, हिंगोली येथे दि. 10 डिसेंबर, 2022 रोजी
दुपारी 3.00 वाजता प्रशिक्षण सत्राचे आयोजन केले आहे.
जिल्ह्यातील सर्व
शासकीय व खाजगी आस्थापनांचे प्रमुख व प्रत्येक कार्यालयातील अंतर्गत तक्रार निवारण
समिती अध्यक्षांनी या प्रशिक्षण सत्रास उपस्थित राहावेत, असे आवाहन विठ्ठल शिंदे,
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment