बांधकाम कामगारांनी सुरक्षा संच व अत्यावश्यक संचाचा लाभ
घेण्यासाठी
नोंद करण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 30 : येथील सरकारी कामगार अधिकारी कार्यालयांतर्गत असलेल्या महाराष्ट्र
इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत नोंदीत बांधकाम कामगारांना
मंडळामार्फत सुरक्षा संच व अत्यावश्यक संच वाटप चालू असून जुलै ते सप्टेंबर, 2022
या कालावधीत नोंदणी, नुतनीकरण केलेल्या (जिवित) बांधकाम कामगारांनी दि. 01 जानेवारी, 2023 पासून
सुरक्षा संच व अत्यावश्यक संच घेण्यासाठी सरकारी कामगार अधिकारी तथा महाराष्ट्र
शासन व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मातोश्री बिल्डींग, प्लॉट क्र. 11
गोळकुधाम सोसायटी, एनटीसी, हिंगोली येथे बांधकाम कामगार नोंदणी पावती घेऊन नोंद
करावी व किट वाटपाची तारीख निश्चित करुन घ्यावी. हे सुरक्षा संच व अत्यावश्यक संच
निशुल्क असून कोणत्याही अमिशाला बळी न पडता कामगारांनी स्वत: या योजनेचा लाभ
घ्यावा, असे आवाहन टी. ई. कराड, सरकारी कामगार अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
******
No comments:
Post a Comment