दिव्यांगाच्या योजनांची
माहिती देण्यासाठी
मार्गदर्शन सत्राचे आयोजन
हिंगोली (जिमाका), दि. 05 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली
यांच्यामार्फत दि. 08 डिसेंबर, 2022 रोजी दुपारी 12.30 वाजता महाराष्ट्र राज्य
दिव्यांग वित्त व विकास महामंडळ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनेबाबत ऑनलाईन
वेबिनारच्या माध्यमातून गुगल मीटवर मोफत मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले
आहे. या ऑनलाईन मार्गदर्शन सत्रामध्ये दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचे
हिंगोलीचे जिल्हा व्यवस्थापक एस. टी. बागूल हे मार्गदर्शन करणार आहेत.
या ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचा लाभ घेण्यासाठी https://meet.google.com/sqr-xskb-gyu
या ऑनलाईन लिंकवर (meeting URL) क्लिक करावे. आपल्याकडे गुगल मीट ॲप (google
meet app) यापूर्वी इन्स्टॉल केलेले नसेल
तर इन्स्टॉल करुन घ्यावे. आपण गुगल मीट ॲप (google meet app) मधून कनेक्ट झाल्यानंतर आस्क टू जॉइन (Ask to
join) वर क्लिक करावे. या सत्रामध्ये सहभागी होण्यासाठी 10 मिनिटे अगोदर जॉईन
करावे. दिलेल्या लिंकमधून कनेक्ट झाल्यावर लगेच आपला व्हिडिओ व माईक बंद (Mute)
करावा. सत्राच्या शेवटी काही प्रश्न विचारावयाचे असल्यास माईक सुरु (unmute) करुन
विचारावे व लगेच माईक बंद करण्याची दक्षता घ्यावी. प्रश्न विचारताना मोजक्या
शब्दात विचारावेत. या सर्व सूचनांचे पालन करुन मार्गदर्शन सत्रामध्ये सहभागी
व्हावेत.
त्या अनुषंगाने जिल्ह्यातील उमेदवारांनी ऑनलाईन मोफत मार्गदर्शन
सत्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त , जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,
हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
*****
No comments:
Post a Comment