डॉ.बाबासाहेब आंबेडकर
महापरिनिर्वाण दिनानिमित्त
विविध लाभ व समता
पर्वाचा समारोप कार्यक्रम संपन्न
हिंगोली (जिमाका),दि. 07 : सामाजिक न्याय व
विशेष सहाय्य विभागाच्या वतीने जिल्ह्यात 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिन ते 06
डिसेंबर डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन कालावधीत "समता
पर्व" कार्यक्रमाचे आयोजन करण्यात
आले असून त्याचाच एक भाग म्हणून मंगळवार, दि. 06 डिसेंबर, 2022 रोजी समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त
शिवानंद मिनगीरे यांच्या मार्गदर्शनाखाली
समता पर्वा निमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन कार्यक्रम, सामाजिक
न्याय विभागाच्या लाभार्थ्यांना विविध लाभाचे वाटप, बक्षिस वितरण व समता पर्वाचा
समारोप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी
जितेंद्र पापळकर हे होते. तर प्रमुख
पाहुणे म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कारार्थी मधुकर मांजरमकर,
महाराष्ट्र राज्य दलितमित्र संघाचे राजाध्यक्ष विजयकुमार निलावार हे उपस्थित होते.
यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कारार्थी विक्रम जावळे, हर्षवर्धन
परसावळे, जगजीत खुराणा, विशाल इंगोले, चक्रपाणी गायकवाड, सत्यजित नटवे, शेषराव
जाधव, सिध्दार्थ गोवंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित
मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापुरुषांच्या पुतळयास पुष्प
पूजन करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर
महापरिनिर्वाण दिन कार्यक्रमाचे आयोजन, सामाजिक न्याय विभागाच्या लाभार्थ्यांना
विविध लाभाचे वाटप, बक्षीस वितरण व समता पर्वाचा समारोप कार्यक्रमात अनु.जाती व नवबौध्द
मागासवर्गीय मुलींची शासकीय निवासी शाळेतील-21 विद्यार्थीं, भारतरत्न डॉ.बाबासाहेब
आंबेडकर स्वाधार योजनेचे-150 लाभार्थी, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे-165
विद्यार्थी व मागासवर्गीय मुलां/ मुलींचे शासकीय वसतिगृहातील-72 विद्यार्थी,
विजाभज आश्रमशाळेतील - 48 विद्यार्थी तसेच शाहु, फुले आबेंडकर केंद्रीय
आश्रमशाळेतील-12 विद्यार्थी अशा एकूण 468 लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते लाभ,
बक्षिस वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज
कल्याणचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी केले. सूत्रसंचालन अशोक इंगोले यांनी केले तर आभार प्रदर्शन सत्यजीत
नटवे यांनी केले.
*****
No comments:
Post a Comment