जलेश्वर तलाव परिसरातील अतिक्रमण काढून घेण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 13 : येथील
जलेश्वर तलाव परिसरामध्ये सरकारी जमिनीवर असलेले अतिक्रमण काढून घेण्याबाबत
तहसीलदार हिंगोली यांनी यापूर्वी नोटीसा दिलेल्या होत्या. या नोटीसला मा. उच्च
न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे आव्हान देण्यात आले होते. मा.उच्च न्यायालय खंडपीठ
औरंगाबाद यांच्याकडील निकाल नुकताच प्राप्त झाला असून अतिक्रमण काढून घेण्याबाबत
आदेशित करण्यात आले आहेत.
त्या अनुषंगाने सर्व अतिक्रमणधारकांना तहसीलदार
हिंगोली यांनी दि. 13 डिसेंबर, 2022 रोजी स्वतःहून 48 तासांमध्ये अतिक्रमण काढून घेण्याबाबत
नोटीस बजावले आहेत. स्वतःहून अतिक्रमण काढून घेतले नाही तर शासनामार्फत अतिक्रमण
काढण्यात येईल व त्याचा येणारा खर्च अतिक्रमण धारकाकडून वसूल करण्यात येईल, असे
आदेश दिले आहेत. त्यामुळे जलेश्वर तलाव परिसरातील अतिक्रमण धारकांनी अतिक्रमण
काढून घेण्याचे आवाहन तहसीलदार हिंगोली यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment