तोंडापूर कृषी विज्ञान केंद्रात जागतिक मृदा दिन उत्साहात साजरा
हिंगोली (जिमाका), दि. 06 : भारतीय कृषि अनुसंधान
परिषद, नवी दिल्ली संलग्नीत कळमनुरी तालुक्यातील तोंडापूर कृषि विज्ञान केंद्रामध्ये
जागतिक मृदा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी माजी खासदार शिवाजीराव माने हे होते.
या कार्यक्रमप्रसंगी माजी खा.शिवाजीराव माने यांनी शेतकऱ्यांना
मृदा दिनाच्या शुभेच्छा दिल्या व अलीकडच्या काळात झपाट्याने वाढत चाललेले शहरीकरण,
सिमेंटचे रस्ते, रासायनिक खतांचा दुरुपयोग होत आहे. यासाठी शेतकऱ्यांनी माती
व्यवस्थापन करणे अत्यंत गरजेचे आहे, असे सांगितले.
यावेळी मार्गदर्शन करताना कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ
शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. पी. पी. शेळके यांनी मातीचे आरोग्य व नैसर्गिक शेती,
जीवामृत बीजामृत व सेंद्रिय खतांचा वापर शेतकऱ्यांनी करावा, असे आवाहन केले. कृषिविद्या विषय विशेषज्ञ प्रा. राजेश भालेराव यांनी मृदेचे महत्व
शेतकऱ्यांना पटवून सांगितले. उद्यानविद्या विषय विशेषज्ञ प्रा. अनिल ओळंबे यांनी फळबागेसाठी मृदा व्यवस्थापन कसे करावे याबाबत माहिती दिली. कीटकशास्त्र
विषय विशेषज्ञ प्रा. अजयकुमार सुगावे यांनी ट्रायकोडर्मा व मेटारायझियम याचा उपयोग
शेतीमध्ये करावा यासंबंधी सर्वांना अवगत केले. कृषी विस्तार विषय
विशेषज्ञ डॉ.अतुल मुराई यांनी माती व्यवस्थापनाची गरज, आवश्यकता, उपयुक्तता व
व्यवस्थापनाच्या पद्धती याबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.मृदा शास्त्र विषय
विशेषज्ञ प्रा. साईनाथ खरात यांनी माती परीक्षणासाठी मातीचा नमुना कसा घ्यावा व
त्याच्या पद्धती व नमुना घेताना घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर माहिती दिली. त्याचबरोबर
सेंद्रीय कर्ब काढण्याचे प्रात्यक्षिक दिले.
यावेळी सुधारित हरभरा लागवड तंत्रज्ञान व माती परीक्षण या
घडीपत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले व त्याचबरोबर माती आरोग्यपत्रिकेचे वितरण
करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. अतुल मुराई यांनी केले व आभार
प्रदर्शन विषय विशेषज्ञ (गृहविद्या) प्रा. रोहिणी शिंदे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ. मनिषा मुंगल, विजय ठाकरे , ओमप्रकाश गुडेवार, गुलाबराव सुर्यंवंशी, संतोष
हनवते, प्रेमदास जाधव, ज्ञानेश्वर माने, योगेश जाधव, आफ्रिन यांचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमास कळमनुरी तालुक्यातील सिंदगी, तोंडापूर व सेनगाव
तालुक्यातील ताकतोडा येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
******
No comments:
Post a Comment