08 December, 2022

 

रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात

सेल्फी पॉईंन्टद्वारे जनजागृती

  • वाहन चालवतांना हेल्मेट व सिटबेल्टचा वापर करण्याचे आवाहन


 

हिंगोली (जिमाका), दि. 08 :  येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सर्व अनुज्ञप्ती धारक व वाहन धारक यांच्यामध्ये रस्ता सुरक्षेविषयी जनजागृती करण्यासाठी दुचाकी वाहन धारकाने नियमित हेल्मेट वापरणे, चारचाकी वाहन धारकाने सीटबेल्टचा नियमित वापर करणे यासाठी सेल्फी पॉईंट उभारण्यात आला आहे.

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात भेट देणारे नागरिक, उमेदवारांनी सेल्फी पॉईंटसोबत सेल्फी काढल्यास त्यामार्फत इतर वाहन चालकांना हेल्मेट व सिटबेल्ट कायम परिधान करण्याची प्रेरणा मिळणार आहे.

हिंगोली जिल्ह्यातील सर्व दुचाकी वाहन धारकाने वाहन चालवितांना हेल्मेटचा वापर केल्यास वाहन अपघातात आपल्या डोक्यास गंभीर इजा होणार नाही. त्यामुळे आपण दुचाकी चालवितांना हेल्मेटचा नियमित वापर करावा. तसेच चारचाकी वाहन चालवितांना आपण सिट बेल्टचा नियमित वापर करावा जेणे करुन अपघात झाल्यास आपणास गंभीर इजा होणार नाही.  

त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील सर्व वाहन धारकानी दुचाकी चालविताना नियमित हेल्मेट व चारचाकी वाहन धारकाने सिटबेल्टचा वापर करावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

*****

No comments: