23 December, 2022

 

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत

शेतकरी प्रशिक्षण सहलीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

हिंगोली (जिमाका), दि. 23 : शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, यासाठी उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालय, हिंगोली अंतर्गत 72  शेतक-यांना दि. 02  ते 06 जानेवारी 2023  या कालावधीत प्रशिक्षण सहलीचे नियोजन आहे. यामध्ये बारामती, राहुरी कृषि विद्यापीठ, सिल्लोड येथील कृषि प्रदर्शन, दिंडोरी, आळंदी याठिकाणी असलेल्या केंद्रास भेटी देण्यात येणार आहेत.

यामध्ये हिंगोली तालुक्यातील-15, कळमनुरी-15. वसमत-115 औढा नागनाथ-12 व सेनगाव तालुक्यातील-15 अशा एकूण-72 शेतकऱ्यांसाठी सहली (अभ्यास दौरा) चे आयोजन केले आहे. फलोत्पादन विषयक घटक राबविलेले तसेच राबविण्यास इच्छुक असलेल्या प्रगतशील शेतक-यांनी संबंधीत तालुका कृषि अधिकारी यांच्या कार्यालयात लेखी अर्ज सादर करुन त्याची पोहच घेणे आवश्यक असून, अर्जासोबत सातबारा, शैक्षणिक पुरवा, आधार कार्ड, कोविडच्या दोन्ही लस घेतल्याचे प्रमाणपत्राची झेरॉक्स जोडणे आवश्यक आहे.

या प्रशिक्षण सहलीमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकन्यांना प्राधान्य राहिल. जातीचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे गरजेचे असून, अर्ज जास्त आल्यास पात्र शेतक-यांची निवड सोडत पध्दतीने होणार आहे. शेतक-यांनी लोकसहभाग म्हणून एक हजार रुपयांचा धनादेश निवड यादी लागल्यापासून दोन दिवसात तालुका कृषि कार्यालयात जमा करावेत, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी शिवसांब लाडके यांनी  प्रसिध्दीपत्रकान्वये केले आहे.                                                                        ******

No comments: