स्वच्छतेच्या अनुषंगाने गावाची होणार तपासणी
स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2023 मध्ये ग्रामपंयातींनी सहभागी होण्याचे
आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 12 : केंद्र सरकारकडून स्वच्छ सर्वेक्षण (ग्रामीण)
2023 राबविले जात असून स्वच्छतेच्या अनुषंगाने गावाची तपासणी होणार आहे. यासाठी
सर्व ग्रामपंचायतीने स्वच्छ सर्वेक्षण (ग्रामीण ) 2023 मध्ये सहभागी होण्याचे
आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री संजय दैने यांनी केले आहे.
देशात स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2023 सुरुवात
झाली असून त्या अंतर्गत गावाची विविध घटकावर आधारित तपासणी केली जाणार आहे. स्वच्छ
सर्वेक्षण ग्रामीण 2023 मध्ये जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीने सहभागी व्हावे.
ग्रामपंचायत स्वच्छ सर्वेक्षण गावाचे स्वयं मूल्यांकन करणे
अनिवार्य आहे. त्याशिवाय सहभाग नोंदणी होत नाही. स्वयं मूल्यांकन भरण्यासाठी ई-ग्राम
स्वराज्य या संकेतस्थळावर लिंक उपलब्ध करुन दिली आहे. लिंकच्या माध्यमातून
प्रत्येक ग्रामपंचायतीने स्वयंमूल्यांकन भरणे अनिवार्य आहे. अन्यथा स्वच्छ सर्वेक्षण
ग्रामीण 2023 मध्ये सहभाग होण्यास पात्र ठरणार नाही. स्वयं मूल्यांकनात सांडपाणी
घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत गावात झालेल्या कामाची माहिती भरण्यासाठी जास्तीत जास्त
25 मिनिटाचा कालावधी लागतो. प्रत्येक गावाचे प्रथम स्वयं मूल्यांकन 15 डिसेंबर,
2022 पूर्वी पूर्ण करावेत, अशा सूचना जिल्हास्तरावर सर्व पंचायत समितीच्या गटविकास
अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.
स्वच्छ सर्वेक्षण( ग्रामीण) 2023 मध्ये सहभागी
होण्याची सर्व ग्रामपंचायतींना संधी असून ई-ग्रामस्वराज्य संकेतस्थळावर जाऊन
संबंधित ग्रामपंचायत ग्रामसेवक, ग्रामविस्तार अधिकारी यांनी दिलेल्या लिंकद्वारे
प्रत्येक गावाचे स्वयं मूल्यांकन करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे पाणी व
स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए. एल. बोंद्रे यांनी केले आहे.
स्वच्छ सर्वेक्षणाबाबत अधिकृत इतर सर्व माहिती जिल्हास्तरावरील समाजशास्त्रन
सल्लागार राधेश्याम गंगासागर व तालुक्यातील जिल्हा समन्वय तज्ञ /सल्लागार
सनियंत्रण जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष जिल्हा परिषद हिंगोली करणार आहे.
*****
No comments:
Post a Comment