समता पर्व निमित्त
अनु.जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तींना भेटी
हिंगोली (जिमाका), दि. 02 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने
जिल्ह्यात 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिन ते 06 डिसेंबर डॉ.बाबासाहेब आंबेडकर
महापरिनिर्वाण दिन कालावधीत "समता पर्व" कार्यक्रमाचे आयोजन
करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून दिनांक 02 डिसेंबर, 2022 रोजी शिवानंद मिनगीरे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांच्या
मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील अनु.जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांना भेटी देऊन
कामांची पाहणी केली व वस्तीमधील लाभार्थ्यांशी संवाद साधण्यात आला.
समता पर्वा निमित्त अनु.जाती व नवबौध्द
घटकांच्या वस्त्यांना समाज कल्याणचे सहायक आयुक्त शिवानंद मिनगीरे, समाज कल्याण
निरीक्षक एम.आर.राजूलवार, एस.आर.वडकुते, बी.टी.टेंभूर्णे, कनिष्ठ लिपिक एम.जी.फड
यांनी आज दि. 02 डिसेंबर, 2022 रोजी हिंगोली तालुक्यातील सागद, देऊळगाव रामा, सेनगाव
तालुक्यातील बाभूळगाव, वसमत तालुक्यातील लाख,
पांगरा शिंदे तसेच हिंगोली नगर परिषद येथील प्रभाग क्र.16 मधील बावनखोली वस्ती इत्यादी
अनु.जाती घटकांच्या वस्त्यांना भेटी देऊन सर्वांनी अनु.जाती व नवबौध्द घटकांच्या
वस्तीमध्ये संविधान उद्देशिकेचे वाचन करुन किमान 500 ते 550 लाभार्थ्यांना भेटी दिल्या.
तसेच वस्त्यामधील विविध कामांची पाहणी करण्यात आली. यावेळी संबंधित वस्तीमधील नागरिकांशी
चर्चा करुन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य
विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती सांगितली.
****
No comments:
Post a Comment