जिल्हा
युवा मंडळ पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 02 : युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत
सरकारतर्फे ग्रामीण युवा मंडळांना स्वयंप्रेरणेने ग्रामीण भागात समाजकार्य व
विकासाचे कार्य करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी जिल्हा युवा मंडळ पुरस्कार
नेहरु युवा केंद्रामार्फत दिला जातो. जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या
अध्यक्षतेखाली गठीत निवड समितीतर्फे एकाच मंडळाची निवड या पुरस्कारासाठी केली
जाते. पुरस्कृत मंडळाला 25 हजार रुपये व प्रशस्ती पत्र देण्यात येते.
नेहरु युवा
केंद्र हिंगोली कार्यालयाशी संलग्नीत तसेच धर्मादाय आयुक्त कार्यालयाद्वारा
नोंदणीकृत झालेल्या 18 ते 29 वयोगटातील युवा मंडळांना हा पुरस्कार प्रदान करण्यात
येणार आहे.
हिंगोली
जिल्ह्यातील नोंदणीकृत व नेहरु युवा केंद्र हिंगोली सांबत संलग्नीत असलेल्या युवक
व महिला मंडळ जे 01 एप्रिल, 2021 ते 31 मार्च, 2022 मध्ये प्रामुख्याने आरोग्य व
कुटुंब कल्याण, पर्यावरण संवर्धन, व्यवसाय प्रशिक्षण, साक्षरता, महिला सशक्तीकरण,
लोककला व क्रीडा, रोजगार निर्मिती, श्रमदान, सामाजिक समस्याबद्दल मोहिम, समाज
कल्याण, स्वच्छता अभियान इतर क्षेत्रात सक्रीय कार्यरत होते, असे जिल्हा युवा
अधिकारी, नेहरु युवा केंद्र, प्लॉट नं. 42/1, नाईकनगर, जिल्हाधिकारी
कार्यालयासमोर, हिंगोली येथे दि. 13 डिसेंबर, 2022 च्या आत विहित नमुन्यात अर्ज
करावेत. अर्जाचा विहित नमुना व अधिक माहिती नेहरु युवा केंद्र, हिंगोली यांच्या
कार्यालयात उपलब्ध आहे, असे जिल्हा युवा अधिकारी, नेहरु युवा केंद्र, हिंगोली यांनी
कळविले आहे.
****
No comments:
Post a Comment